aryan khan esakal
महाराष्ट्र बातम्या

आर्यन खानला दिलासा नाहीच; जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकऱणी (cruise drugs case) शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खान (Aryan khan) याला हायकोर्टाकडूनही (high court) दिलासा मिळाला नाही. एनसीबीने (NCB) अटक केल्यानंतर अद्याप आर्यनला जामिन मिळालेला नाही. त्याच्या जामिन अर्जासाठी वकिलांनी हायकोर्टात धाव घेतली. मात्र यावरची सुनावणी २६ ऑक्टोबरला होईल असे न्यायालयाने म्हटले आहे.

आर्यनला आजही दिलासा नाहीच

मुंबई हाय कोर्टात न्या. नितीन सांबरे यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चट याच्या जामीनावरही सुनावणा झाली. हायकोर्टात आज आर्यनच्या वकिला़ंनी जामीन अर्ज दाखल केला होता. आर्यन खान याचा आज पुन्हा जामीन फेटाळला गेला. 14 दिवसानंतरही आर्यन खानला जामीन मिळालेला नाही. त्यामुळे शाहरुखची डोकेदुखी वाढली आहे. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सोमवारी सुनावणीसाठी विनंती केली होती.

मुक्काम तुरुंगातच...

आर्यन खानच्या वतीनं अ‌ॅड.सतीश मानेशिंदे आणि अ‌ॅड. अमित देसाई यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्या अर्जावर आज सुनावणीला सुरुवात झाली. आर्यनच्या वतीनं मानेशिंदे यांनी न्यायालयात बाजू मांडण्यास सुरुवात केली, त्यांनी जामीन अर्जावर उद्या किंवा सोमवारी सुनावणी ठेवण्याची विनंती करत आमच्या अशिलाकडे कोणतही ड्रग्ज सापडलं नसल्याचा युक्तिवाद केला. एनसीबीचे वकिल अनिल सिंग यांनी जामीन अर्जाची प्रत मिळाली नसल्याचं सांगितलं. त्यावर न्यायालयानं मंगळवारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं. आता मंगळवारी 26 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. मुनमुन धामेचा हिच्या जामीन अर्जावर देखील मंगळवारी सुनावणी होणार आहे. तर, शाहरुख खान आर्यन खानला भेटण्यासाठी पोहोचला होता.

आर्यन खान विरोधात एनसीबीकडे पुरावे असल्याने त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यासाठी एनसीबीने काही कारणं कोर्टापुढे मांडली आहेत. त्यापैकी एक म्हणजे आर्यन खान हा नियमित ड्रग्ज घेत होता. तो ड्रग्ज घेणारा नियमित ग्राहक होता. अरबाज मर्चंटकडे ड्रग्ज सापडलं. तेव्हा आर्यनही त्याच क्रुझवर होता. ड्रग्ज प्रकरणात आर्यनला अटक केल्यानंतर एनसीबीने त्याचा मोबाईल ताब्यात घेतला. यावेळी त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटचा तपास करण्यात आला असता त्यात ड्रग्ज रॅकेटशी संबंधित अनेक बाबी एनसीबीला आढळून आल्याचं सूत्रांनी सांगितलं. एका नवोदित अभिनेत्रीसोबतचे आर्यनचे चॅटही एनसीबीच्या हाती लागले आहेत,. त्यातही ड्रग्जवर तो चर्चा करत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेही त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT