zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

Solapur: मोठी बातमी! अधिकाऱ्यांची ७० टक्के पदे रिक्त असल्याने शाळांना भेटीच नाहीत; शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

Latest School News: प्राथमिक शिक्षण विभागाकडील केंद्रप्रमुखाकडे १० ते १२ शाळा, दोन ते पाच केंद्राची जबाबदारी विस्ताराधिकाऱ्यांकडे तर गटशिक्षणाधिकाऱ्याकडे प्रत्येक तालुक्यातील शाळांची जबाबदारी दिलेली असते. मात्र, सध्या या अधिकाऱ्यांची ६५ टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत जाऊन तेथील गुणवत्तेसह अन्य बाबींचा आढावा घेण्यास अडचणी येत आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : शाळांची गुणवत्ता वाढावी, शाळांमधील अध्यापन, माध्यान्ह भोजन अशा विविध बाबींवर लक्ष राहण्यासाठी शालेय शिक्षण विभागाची त्रिस्तरीय यंत्रणा आहे. त्याची जबाबदारी केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांवर आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागासाठी या अधिकाऱ्यांची २७४ पदे मंजूर आहेत, पण सध्या १०४ अधिकारीच आहेत. त्यामुळे अनेक शाळांना भेटीच दिल्या जात नसल्याची वस्तुस्थिती आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाकडील केंद्रप्रमुखाकडे १० ते १२ शाळा, दोन ते पाच केंद्राची जबाबदारी विस्ताराधिकाऱ्यांकडे तर गटशिक्षणाधिकाऱ्याकडे प्रत्येक तालुक्यातील शाळांची जबाबदारी दिलेली असते. मात्र, सध्या या अधिकाऱ्यांची ६५ टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत जाऊन तेथील गुणवत्तेसह अन्य बाबींचा आढावा घेण्यास अडचणी येत आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल वाढलेला असतानाच जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करीत अनेक शाळांची पटसंख्या कमी होत असल्याची वस्तुस्थिती आहे.

या पार्श्वभूमीवर सद्य:स्थितीत ५३ शाळांची पटसंख्या १० पेक्षा आहे. याशिवाय १०० पेक्षा अधिक शाळांचा पट १० ते २० पर्यंतच खाली आला आहे. गुणवत्ता वाढली तर पटसंख्या वाढणार आहे आणि त्यासाठी अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी महत्त्वाच्या मानल्या जातात. मात्र, सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे अधिकाऱ्यांची पदे ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत रिक्त असल्याने शेकडो शाळांना भेटीच दिल्या जात नसल्याचे चित्र आहे. अरबळी जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रकार त्यातूनच घडल्याचे बोलले जात आहे.

शाळांना नियमित भेटी देण्याचे निर्देश

प्रत्येक अधिकाऱ्याने महिन्यातून किमान २० शाळांना भेटी देऊन तेथील गुणवत्ता व दैनंदिन कामकाज पाहणे अपेक्षित आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७७ शाळा आहेत. सध्या आपल्याकडे ६१ केंद्रप्रमुख, ४१ विस्ताराधिकारी व एक गटशिक्षणाधिकारी आहेत. उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना भेटी सुरू आहेत. अधिकाऱ्यांच्या शाळा भेटीचा अहवाल दरमहा घेतला जाणार आहे.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर

‘प्राथमिक शिक्षण’च्या अधिकाऱ्यांची स्थिती

  • मंजूर केंद्रप्रमुख

  • १९९

  • कार्यरत केंद्रप्रमुख

  • ६२

  • मंजूर विस्ताराधिकारी

  • ६४

  • कार्यरत विस्ताराधिकारी

  • ४१

  • मंजूर गटशिक्षणाधिकारी

  • ११

  • कार्यरत गटशिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT