शिवशाही बस sakal
महाराष्ट्र बातम्या

''एअर प्रेशर कमी होताच आपोआप उघडतो ‘शिवशाही’चा दरवाजा, तासभर राहतो हवेचा दाब''; स्वारगेटमधील प्रकरणातील बस चालकाची माहिती

शिवशाही बस सुरू असताना ब्रेक आणि दरवाजा हवेच्या प्रेशरवर काम करतो. बस बंद होताच एक तासाच्या आत हवेचा प्रेशर कमी झाल्यानंतर बसचा दरवाजा अनलॉक होतो. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधमाने या तांत्रिक त्रुटीचा फायदा उचलला. संबंधित बस ही सोलापूर डेपोची असून शिवशाही बसचे सत्य समोर आले.

अरविंद मोटे

सोलापूर : शिवशाही बस सुरू असताना ब्रेक आणि दरवाजा हवेच्या प्रेशरवर काम करतो. बस बंद होताच एक तासाच्या आत हवेचा प्रेशर कमी झाल्यानंतर बसचा दरवाजा अनलॉक होतो. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधमाने या तांत्रिक त्रुटीचा फायदा उचलला. संबंधित बस ही सोलापूर डेपोची असून त्या बसच्या चालकाकडून माहिती घेतली असता शिवशाही बसचे सत्य समोर आले.

सोलापूर आगाराचे चालक शंकर लालू चव्हाण हे मंगळवारी (ता. २५) रात्री नऊ ४५ ची सोलापूर- स्वारगेट (एम एच ०६ बी डब्ल्यू ०३१९) ही बस घेऊन पुण्याकडे गेले. स्वारगेट स्थानकावर बुधवारी (ता. २६) पहाटे तीन वाजून ४५ मिनिटांनी ही बस पोचली. नेहमीप्रमाणे चालक चव्हाण हे एका बाजूला बस लावून सोलापूर आगारासाठी असलेल्या विश्राम कक्षात जाऊन झोपले. सकाळी दहा वाजता स्वारगेट बस स्थानकावरील सुरक्षारक्षकांनी त्यांना झोपेतून जागे केले आणि एसटीच्या अधिकाऱ्याने त्यांच्याकडून जबाब लिहून घेतला. तोपर्यंत त्यांना घडलेल्या घटनेबद्दल काहीही माहीत नव्हते.

शिवशाही बस ही वातानुकलीत बस आहे. हवेच्या प्रेशरचे बटन दाबल्यानंतर दरवाजा चालू बंद होतो. ही यंत्रणा बस सुरू असताना सुरळीत चालते. मात्र, बस बंद झाल्यानंतर साधारणत: एक तासभर हवेचा दाब शिल्लक राहतो. त्यानंतर हळूहळू हवेचा दाब उतरल्यानंतर हा दरवाजा कोणीही हाताने उघडू शकते. अथवा बंद करू शकते. यामुळे एक तासानंतर ही बस ‘आओ- जाओ घर तुम्हारा’ अशा परिस्थितीत येते. याच तांत्रिक त्रुटीचा फायदा संबंधित नराधमाने उचलला आहे.

बस नॉनस्टॉप असल्याने नव्हता वाहक

सोलापूर-स्वारगेट ही बस नॉनस्टॉप आहे. या गाडीचे बुकिंग सोलापूरमधून तसेच मोहोळ, टेंभुर्णी येथून होते. या गाडीत वाहक नसतो. फक्त चालकच ही गाडी घेऊन जातात. यामुळे श्री. चव्हाण हे एकटेच गाडी घेऊन गेले होते. दरम्यान, संबधित बस पंचनाम्यासाठी पुणे येथेच असून चालक सोलापूरला आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT