Asaduddin Owaisi said Gyanvapi mosque will remain Asaduddin Owaisi said Gyanvapi mosque will remain
महाराष्ट्र बातम्या

असदुद्दीन ओवैसी संतापले; म्हणाले, काहीही करा, ज्ञानवापी मशीदच राहील

सकाळ डिजिटल टीम

व्हिडिओ बनावटही (Video Fake) असू शकतो. हा व्हिडिओ खरा असला तरी ज्ञानवापी मशीद (Gyanvapi mosque) होती, आहे आणि राहील, असे एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले. ज्ञानवापी मशिदीत केलेल्या सर्वेक्षणाचा व्हिडिओ लीक झाल्याबद्दल त्यांनी आक्षेप व्यक्त केला. तसेच हे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे ओवैसी म्हणाले. (Asaduddin Owaisi said Gyanvapi mosque will remain)

माध्यमांमध्ये व्हिडिओ चालवला जात आहे. ते मोठी चूक करीत आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींनी व्हिडिओ दाखवू नका असे सांगितले आहे. हे निवडकपणे कोण देत आहे? तुम्ही लीक करा व काहीही करा. १९९१ चा कायदा आहे. या कायद्यानुसार १९४७ मध्ये मशीद होती आणि राहील, असेही असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस पक्ष गप्प का आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

माझ्यावर आरोप करणारा काँग्रेस पक्ष गप्प का राहिला हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमच्याच सरकारने हा कायदा केला होता. १९९१ च्या संसदेतली चर्चा बघितली तर उमा भारतींनी ज्ञानवापीचं काय होणार अशी ओरड केली होती. तो प्रस्ताव भाजपने गमावला.

१९९१ चा कायदा आहे; तुम्ही काहीही करू शकत नाही. व्हिडिओ काहीही असेल. १९९१ मध्ये आम्ही कायदा केला. पहिली गोष्ट मी व्हिडिओवर विश्वास ठेवत नाही. तो कदाचित संपादित केला गेला असावा. व्हिडिओ (Video Fake) खरा असला तरी तो कायदा आहे, असेही असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले.

व्हिडिओ लीकमध्ये कोणाचा हात आहे?

वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने सोमवारी ज्ञानवापी मशीद (Gyanvapi mosque) संकुलाच्या व्हिडिओग्राफी सर्वेक्षणाची प्रत हिंदू बाजूच्या याचिकाकर्त्यांना देण्याचे आदेश दिले. फिर्यादींनी व्हिडिओग्राफी सर्वेक्षणाची प्रत दुरुपयोग किंवा लीक करणार नाही, असे प्रतिज्ञापत्राद्वारे हमीपत्र दिले आहे. मात्र, सायंकाळी हा व्हिडिओ लीक झाला. हे टाळत फिर्यादींनी मंगळवारी सीलबंद लिफाफे न्यायालयात सादर करून चौकशीची मागणी केली. न्यायालयाने लिफाफे परत घेतले नाहीत. परंतु, तपासाची विनंती मान्य केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT