Aurangzeb Controversy Sakal
महाराष्ट्र बातम्या

Aurangzeb Controversy : धक्कादायक! ओवैसींच्या सभेत पुन्हा औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; पोलीस तैनात

दत्ता लवांडे

बुलढाणा : राज्यात औरंगजेबाच्या स्टेटस प्रकरणावरून हिंदू मुस्लीम समाजात तणाव वाढलेला असतानाच बुलढाणा येथे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणामध्ये मुस्लीम कार्यकर्त्यांनी पुन्हा औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आहेत. यामुळे हिंदू मुस्लीम समाजातील तणाव वाढण्याची शक्यता असल्याने बुलढाण्यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील सालीपुरा येथे एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांची शनिवारी रात्री सभा झाली. यावेळी ओवैसी यांचे भाषण सुरू असताना काही कार्यकर्ते स्टेजच्या जवळ येऊन औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणा देऊ लागले. त्यामुळे सभेमध्ये काही क्षण गोंधळ झाला होता.

"जब तक सूरज चाँद रहेगा, औरंगजेब तेरा नाम रहेंगा" अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी ओवैसी यांनीसुद्धा कार्यकर्त्यांना शांत करत "हा, हा, रहेंगा रहेंगा" असं उत्तर दिलं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडिओ मध्यरात्री उशीरा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे दोन समाजात तणाव पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सभा झाल्यानंतरही कार्यकर्त्यांनी सालीपुरा भागात घोषणा केल्यामुळे पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तर या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू करण्यात आली असून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, याआधी जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला येथे औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवण्यावरून दोन समाजामध्ये तणाव पसरला होता. तर कोल्हापूर शहरात दंगल झाली होती. यामुळे कोल्हापूर शहरातील इंटरनेट सुविधा दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT