असदुद्दीन ओवेसी, अॅड. प्रकाश आंबेडकर
असदुद्दीन ओवेसी, अॅड. प्रकाश आंबेडकर 
महाराष्ट्र

Vidhansabha Election 2019 : ओवेसींनी दिले आंबेडकरांना पत्र, आता हैदराबादमध्ये बैठक

शेखलाल शेख

औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममधील जागावाटपाचा तिढा कायम असल्याची चर्चा असतानाच मंगळवारी (ता.20) एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे बंद लिफाफ्यातील विशेष पत्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांकडे सुपूर्द केले. 

मुंबईतील पक्ष कार्यालयात कादरी यांनी ऍड. आंबेडकरांची भेट घेतली. 26 ऑगस्ट रोजी हैदराबादेत एमआयएमचे मुख्यालय असलेल्या 'दारुस सलाम' येथे ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा होणार असल्याची माहिती डॉ. गफ्फार कादरी यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 
मागील महिन्यात दिल्ली येथे ओवेसी, ऍड. आंबेडकर आणि इम्तियाज जलील, डॉ. गफ्फार कादरी यांच्यात बैठक झाली होती. यामध्ये जागावाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली होती. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डाकडे 80 जागांची मागणी केली आहे. मात्र त्याला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याची चर्चा होती. 

दरम्यान, महाराष्ट्रातील जागावाटपासंदर्भातील असदुद्दीन ओवेसी यांचे विशेष पत्र असलेला बंद लिफाफा औरंगाबाद येथून घेऊन डॉ. गफ्फार कादरी मुंबईला रवाना झाले होते. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात आज सायंकाळी कादरी यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे लिफाफा सोपवला. 
  

वंचित आघाडी आणि एमआयएममधील जागावाटपासंदर्भात कोणताही आधार नसलेल्या चर्चा होत आहेत. असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर हे दोन्ही नेते अतिशय प्रगल्भ आहेत. हे दोन्ही नेते आता हैदराबादेत भेटणार आहेत. दोन्ही पक्ष ताकदीने मैदानात उतरणार आहेत.'' 
  डॉ. गफ्फार कादरी, नेते, एमआयएम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT