Ashadhi Ekadashi 2023 NCP Calendar goat and mosque on Shri Hari Vitthal images bjp criticise  
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Ekadashi 2023: विठुरायाच्या फोटोवर हिरवा चांद आणि बोकड? राष्ट्रवादीच्या कॅलेंडरवर भाजपने साधला निशाणा

राष्ट्रवादीच्या कॅलेंडरवरुन राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले.

धनश्री ओतारी

राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादीचे कॅलेंडर चर्चेत आहे. या कॅलेंडरवर विठुरायाच्या फोटोवर हिरवा चांद आणि बोकडाची प्रतिमा दिसत आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपने हा फोटो शेअर करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Ashadhi Ekadashi 2023 NCP Calendar goat and mosque on Shri Hari Vitthal images bjp criticise )

राष्ट्रवादीच्या कॅलेंडरवर, विठुरायाच्या फोटोवर हिरवा चांद आणि बोकड दाखवून राष्ट्रवादीला काय दाखवायचं आहे ? असा संतप्त सवाल भाजपने ट्विट करत उपस्थित होत आहे. तसेच, जाणीवपूर्वक हिंदू धर्मियांच्याच भावना दुखावण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. विठुरायाची ही विटंबना महाराष्ट्र सहन करणार नाही. असा इशाराही भाजपने दिला आहे.

भाजपच्या या प्रश्नावर अद्याप राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि शरद पवार काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे कॅलेंडर नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख दुनेश्‍वर पेठे यांनी छापले आहे.

एकाच दिवशी दोन सण आल्याने वार्षिक कॅलेंडरमध्ये प्रिटिंगदरम्यान अनवधानाने चूक झाली आहे. यात कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. यावरून वारकरी, भक्तांच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो. हा निश्चितच गंभीर विषय असल्याने सणासुदीच्या दिवसात कुणीही यावर राजकारण करू नये, असे आवाहन करत शहराध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT