ashadhi-wari-2023 Four Warkari students from Jalgaon claimed beaten up by police watch Video  
महाराष्ट्र बातम्या

Wari 2023 : फडणवीसांचा दावा खोटा? पोलिसांनी एकांतात नेऊन मारलं, जळगावच्या विद्यार्थी-वारकऱ्याचा Video Viral

रोहित कणसे

आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं काल आळंदी येथून प्रस्थान झालं. मात्र यावेळीमंदिर व्यवस्थापनाने केवळ मानाच्या पालख्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिल्याने एकच गोधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. तसेच या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यानंतर विरोधकांकडून सरकार आणि पोलिस दल यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

मात्र यादरम्यान आळंदीमध्ये पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाल्याच्या चर्चांदरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्ज झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. आळंदीत केवळ बाचाबाची आणि झटापट झाली आणि फक्त वारकऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला असे सांगण्यात आले. तसेच कोणीही या घटनेचं राजकारण करू नये असेही फडणवीसांनी सांगितलं.

दरम्यान आता या घटनेत वारकऱ्यांकडून देखील मारहाण झाल्याचं सांगण्यात आलं आहे. जळगावहून आलेल्या विद्यार्था-वारकऱ्याने एका व्हिडीओच्या माध्यमातून आळंदीत त्याच्यासोबत घडलेली आपबीती सांगितली आहे. पोलिसांकडून एक घरात घेऊन जात चार जणांना मारहाण झाल्याचा दावा एका वारकरी विद्यार्थ्याने केला आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे?

या व्हिडीओमध्ये जळगाव जिल्ह्यातील शिक्षण घेत असलेला वारकारी असून आम्ही ढोक महाराज संस्थेचे विद्यार्थी आहोत असे सांगितले. तसेच आम्ही चार जण होतो आणि वीस पोलिस होते, यांनी आम्हाला एकांतात घेवून जात मारहाण केली असं सांगितलं. या विद्यार्थ्याने सांगितलं की, पोलिसांनी आम्हाला एकाजणाच्या घरात नेऊन मारलं. तसेच पोलिसांनी आमच्यावर हात का उचलला असा प्रश्न देखील त्यांने यावेळी विचारला आहे. व्हिडीओमध्ये या विद्याऱ्याच्या शर्टवर रक्ताचे डाग देखील दिसत आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांवर बळाचा वापर झाल्याचे नाकारले होते, फडणवीस म्हणाले की, आळंदीमध्ये लाठीचार्ज झालेला नाही. वारकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची आणि झटापट झाली. मागील वर्षी तेथे चेंगराचेंगरी झाली होती. महिलाही जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावेळी काटेकोरपणे नियम पाळले जात आहेत.

फडणवीसांनी सांगितलं की, मानाच्या ५६ दिंड्यांमधील ७५ पासेस देण्यात आले होते. मंदिराबाहेर काही वारकरी आणि तरुण होते, त्यांची आत जाण्याची मागणी होती. ४००-५०० जण आत जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी त्यांना थांबवलं. त्यामुळे थोडा तणाव निर्माण झाला होता, असं गृहमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT