Ashadhi Wari 2024 sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Wari 2024 : दुमदुमली भूवैकुंठनगरी

पावलो पंढरी वैकुंठभवन, धन्य आजि दिन सोनियाचा...ही भावना आज पंढरीत दाखल झालेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात आहे.

सकाळ वृत्तसेवा

शंकर टेमघरे

पंढरपूर : पावलो पंढरी वैकुंठभवन, धन्य आजि दिन सोनियाचा...ही भावना आज पंढरीत दाखल झालेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात आहे. आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वर, मुक्ताईनगर, सासवड, पैठणसह विविध ठिकाणांहून आलेल्या सुमारे दहा लाख भाविकांनी पंढरीत प्रवेश केला. त्यामुळे अवघा रंग एक झाला अशी पंढरीची अवस्था झाली आहे. कटेवर कर ठेवून भक्तांची वाट पाहणाऱ्या विठुरायांची नगरी हरिनामाने दुमदुमून गेली आहे.

राज्यात पेरणीला पूरक पाऊस झाल्याने यंदा प्रस्थान सोहळ्यापासून सर्वच पालखी सोहळ्यांमध्ये वारकऱ्यांची संख्या अधिक होती. पंढरीत पालख्या दाखल होताना त्यामध्ये काही पालखी सोहळ्यांमध्ये दुपटीने तर काही पालखी सोहळ्यात सुमारे पंचवीस टक्के वारकरी वाढले आहेत. त्यामुळे पंढरीत प्रचंड गर्दी झाली आहे. जिथे पाऊस झाला नव्हता तेथील शेतकरी पेरण्या करून पंढरीत थेट दाखल झाले आहेत. पंढरीचा सुमारे पाच किलोमीटरचा परिसर वारकऱ्यांच्या गर्दीने भरून गेला आहे. ६५ एकरात जागा उरली नाही. चंद्रभागेचा तीर वारकऱ्यांच्या गर्दीने फुलला आहे.

संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांचे सोहळे सायंकाळी शहरात दाखल झाल्यानंतर सर्व रस्त्यांवर वारकरीच वारकरी दिसून येत आहेत. दहा लाखांहून अधिक वारकरी आजच पंढरीत दाखल झाले आहेत. आज रात्री आणि उद्या दिवसभरात थेट खासगी वाहनाने, एसटीने येणारे वारकऱ्यांची संख्या वाढेल ती वेगळीच. त्यामुळे विक्रमी वारीची शक्यता आहे. काही पालखी सोहळ्यांनी उद्याची गर्दीची शक्यता लक्षात घेऊन दशमीला म्हणजे आजच मंदिर आणि ग्रामप्रदक्षिणा केली. पंढरपूरकरांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी निरनिराळ्या प्रकारची सोयी केल्या आहेत.

राज्य सरकार पालखी सोहळे निघण्याआधीपासूनच वारकऱ्यांना सेवासुविधा देण्यासाठी कार्यरत होते. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समक्ष येऊन वारकऱ्यांच्या सेवासुविधांबाबतची माहिती घेऊन वारकऱ्यांना कोणतीही सुविधा कमी पडू नये यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT