Ashadhi Wari  sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Wari : पादुकांच्या नीरास्नानानंतर रंगला रिंगण सोहळा;पालखी तळापासून नदी पात्रापर्यंत फुलांच्या पायघड्या

पहाटेचा नित्य अभिषेक, त्यानंतर पादुकांना नीरास्नान, दीड तास रंगलेला रिंगण सोहळा आणि विठुरायाचे नाम यामध्ये आज अकलूजनगरी दंग झाली होती. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी आणि अकलुजनगरीतील भाविक धन्य होऊन ब्रह्मसुखाची अनुभूती घेत होते.

राजेंद्रकृष्ण कापसे

अकलूज : पहाटेचा नित्य अभिषेक, त्यानंतर पादुकांना नीरास्नान, दीड तास रंगलेला रिंगण सोहळा आणि विठुरायाचे नाम यामध्ये आज अकलूजनगरी दंग झाली होती. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी आणि अकलुजनगरीतील भाविक धन्य होऊन ब्रह्मसुखाची अनुभूती घेत होते.

‘कथा त्रिवेणीसंगम देव भक्त आणि नाम। तेथींचें उत्तम चरणरज वंदितां॥’’ या अभंगात तुकोबारायांनी त्रिवेणी संगम आणि त्याचे सकारात्मक परिणाम सांगितले आहे. सोहळ्याच्या वाटचालीत पुणे जिल्ह्यातील शेवटचे गाव सराटी येथे सकाळी पादुकांना नीरा नदीत स्नान घातले. देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख माणिक मोरे, विशाल मोरे, संतोष मोरे, विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे व पुंडलिक महाराज देहूकर आदी उपस्थित होते. पालखी तळापासून नदी पात्रापर्यंत फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. देहूकर दिंडीचे विणेकरी नाना महाराज मोरे दिंडीसह उपस्थित राहिले. अध्यक्ष, विश्वस्त पादुका डोक्यावर घेऊन नदी किनारी गेले होते. त्यावेळी, ‘अवघीं च तीर्थे घडलीं एकवेळा। चंद्रभागा डोळां देखिलिया॥’ या अभंगाची आळवणी झाली. पादुकांना स्नान घातले. त्यानंतर अभिषेक आणि आरती झाली. पादुका पालखीत ठेवल्या. पुणे जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेकडून चांगली सेवा मिळाल्याबद्दल त्यांच्या अधिकाऱ्यांचा फेटा बांधून, उपरणे व नारळ देऊन संस्थानने सत्कार केला. सकाळी आठ वाजता पालखी सोहळा अकलूजकडे निघाला.

सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

पालखीने साडेआठ वाजता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. अकलूज येथील माने विद्यालयाच्या प्रांगणात साडेदहा वाजता चौघडा पोहोचला. त्यानंतर पालखी रथ आला. पावसाचा शिडकावा झाला. तशातच गोल रिंगण सोहळा रंगला. देहुकरांच्या सूचनेनुसार सुरुवातीला पताकाधारी, हंडा, तुळस घेतलेल्या महिला, विणेकरी, टाळकरी मृदंग वादक यांची प्रत्येकी एक प्रदक्षिणा झाली. त्यानंतर, देवाचा अश्व व स्वाराचा अश्व धावले. मोहिते पाटील परिवारातर्फे अश्वांचे पूजन झाले. दोन्ही अश्वांना रिंगण दाखवत प्रदक्षिणा पूर्ण केली. दोन्ही अश्वांनी चार प्रदक्षिणा पूर्ण करत नेत्रदीपक दौड केली. रिंगणात सांप्रदायिक खेळ सुरू झाले. त्यानंतर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांची आरती झाली. त्यानंतर पालखी खांद्यावर घेतली आणि विसाव्याच्या ठिकाणी पोहोचली. नंतर समाज आरती झाली आणि सोहळा मुक्कामी विसावला.

माळीनगरला आज उभे रिंगण

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (ता. १३) सकाळी सात वाजता अकलूज येथून बोरगावकडे मार्गस्थ होईल. त्या वाटचालीत सोहळ्यातील पहिले उभे रिंगण माळीनगर येथे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT