esakal
महाराष्ट्र बातम्या

शिंदे गटाच्या आमदाराचा बॅनरवर घोळ, दिघेंच्या जागी प्रसाद ओकचा फोटो

धनश्री ओतारी

सलग दोन वर्षांच्या खंडांनंतर यंदा आषाढी एकादशी रविवारी (दि. १०) सार्वजनिकरीत्या मंदिरांमध्ये साजरी केली जाणार आहे. या निमित्त शहर आणि जिल्ह्यात अनेक कार्यक्रम, स्पर्धेंच आयोजन केले जाते. दरम्यान, मुंबईतील शिवतीर्थ मैदानावर चित्रकला स्पर्धा ठेवण्यात आली आहे. यासंदर्भात होर्डींग्जदेखील झळकवण्यात आले आहे. हे होर्डींग चांगलेच चर्चेत आलं आहे. या होर्डिंवर मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यामध्ये आनंद दिघे यांचादेखील फोटो लावला आहे. मात्र, त्याचा हा फोटो चित्रपटातील झळकवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र चांगलीच खळबळ माजली आहे. (ashadi ekadashi Photo of Prasad Oak on the banner instead of Anand Dighe)

रंगात रंगु पांडुरंगात रंगु या नावाने चित्रकला स्पर्धेचे होर्डींग लावण्यात आले आहेत. या होर्डिंगवर हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचादेखील फोटो लावण्यात आला आहे. मात्र, दिघे यांचा हा फोटो चुकीचा आहे.

काहीदिवसांपूर्वी, 'धर्मवीर' चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद मिळाला. धर्मवीर चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली होती. हाच चित्रपटातील दिघेंचा फोटो चित्रकला स्पर्धेच्या होर्डींग लावण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

यंदा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने त्यांच्या हस्ते आषाढी एकादशीची शासकीय महापूजा होणार असल्याचे निश्चित झालं आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सहअध्यक्ष आणि सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना महापूजेसाठी आमंत्रित केलय. १० जुलैला आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पूजा केली जाणार आहे.

अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास या चित्रपटाच्यानिमित्ताने रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आला. आता मराठीमधील या सुपरहिट चित्रपटाला पहिलावहिला पुरस्कार मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT