Ashish Deshmukh Suspended e sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashish Deshmukh Suspended : आशिष देशमुखांची काँग्रेसमधून हकालपट्टी! ६ वर्षांसाठी केलं निलंबीत

रोहित कणसे

आशिष देशमुख यांचं काँग्रेस पक्षामधून ६ वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे आशिष देशमुख यांना काँग्रेस पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती.

एकून सहा वर्षांसाठी आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यापूर्वीच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी गेले होते. त्यानंतर देशमुख यांना भाजपकडून विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. यानंतर आता आशिष देशमुख यांची हकालपट्टी करण्यात आली. ते काटोलचे माजी आमदार आहेत.

५ एप्रिल रोजी काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांना एक नोटीस पाठवली होती. यानंतर देशमुख यांनी ९ एप्रिल रोजी उत्तर दिलं. पण हे उत्तर समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्याच पक्षाविरोधत वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT