ashish shelar sakal
महाराष्ट्र बातम्या

"येत्या काळात महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करुन सोडणार"

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर केलं भाष्य

सुधीर काकडे

आगामी काळात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुका तसेच, मुंबई मनपा निवडणुकीच्या अनुषंघाने भाजपने जोरदार तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचसाठी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमीटीची बैठक आज मुंबईत पार पडली. यानंतर भाजप आमदरा आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला येत्या काळात आम्ही सळो की पळो करून सोडणार असल्याचं सांगितलं.

आशिष शेलार यांनी याबद्दल बोलताना महाविकास आघाडी सरकारसमोर भाजप एक मोठं आवाहन निर्माण करणार असल्याचे सांगितले. आगामी काळातील १५ विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आमच्या ताकदीच्या आधारावर यश मिळवण्यासाठी योजना आम्ही बनवलेली आहे. तसेच राज्याचं महाविकास आघाडीच्या कुकृत्याचं, गैरकारभाराचं आणि भ्रष्टाचाराचं या विषयातला सुद्धा आम्ही नियोजनबद्धरित्या जनतेसमोर जाणार आहोत अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.

मोदी आणि केंद्रातलं सरकार याबद्दल बदनामीचा सुनियोजित कट तीन्ही पक्ष कधी बरोबर कधी विरोधात जाऊन करत आहेत. असत्याच्या पेरणीच्या आधारावर यशाच्या विजयाची गुढी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तो सफल होऊच शकत नाही. महाराष्ट्रातली जनता त्याला थारा देऊच शकत नाही. त्यामुळे या बदनामीला सुरुवात करणाऱ्या या नेत्यांविरोधात या पक्षांच्या विरोधात भांडाभोड सुनियोजित पद्धतीनं करण्याचा आम्ही कार्यक्रम आयोजित करणार असंही आशिष शेलार यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SA 2nd Test: दक्षिण आफ्रिकेच्या शेपटाने पाकिस्तानला टपली मारली; ८ बाद २३५ वरून मॅच ४००+ पोहोचवली, शेजाऱ्यांची रडारड

Jaish-e-Mohammed : पाकिस्तानचा नवा डाव! महिलांसाठी 'जिहादी कोर्स'ची ऑनलाईन सुरुवात; प्रवेश फी फक्त 156 रुपये, कोर्समध्ये काय शिकवले जाणार?

Realme ने आणलाय सुपर Smartphone! बदलू शकता बॅक कॅमेरा, फीचर्स पाहून शॉक व्हाल अन् किंमत फक्त एवढीच...दिवाळीला खरेदी कराच

Diwali 2025: आज पाडवा आणि गोवर्धन पूजा, उद्या भाऊबीज; चुकवू नका महत्त्वाचे मुहूर्त

Latest Marathi News Live Update : शिर्डीला पावसानं झोडपलं, पावसामुळे भाविकांची तारांबळ

SCROLL FOR NEXT