Nawab Malik-Ashish Shelar
Nawab Malik-Ashish Shelar google
महाराष्ट्र

''आरोपांवर मलिकांनी स्वतःच कबुली दिलीय, नवाबी भाडेकरू मुंबईत सापडणार नाही''

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ''आमच्या आरोपांचे उत्तर नवाब मलिकांनी (Nawab malik) दिले आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोपांना मलिक यांनी कबुल असे उत्तर दिले आहे. मोहम्मद सलीम पटेल याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपाला मौन कबुली दिली आहे. त्यांनी तीनवेळा कबूल म्हणून स्वतःचा कबुली जबाब दिला आहे. हसीना पारकरच्या विषयात बोलायची हिम्मत नसल्यामुळे त्याला मौन कबुली दिली आहे'', असं भाजपचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) म्हणाले.

''सरदार शाहवली खान बॉम्बस्फोटात आरोप आहे. त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार केला. यात नवाब मलिकांना कबूल असे उत्तर दिले. लाखोंच्या मालमत्तेचे कवडीमोलाने मालकी हक्क मिळविले त्यावर नवाब मलिकांचे कबूल उत्तर आहे. ताडातील आरोपींकडून जमीन जप्त व्हायची सोडून स्वतःकडे वळविली या आरोपाला देखील नवाब मलिकांनी कबूल उत्तर दिले आहे. नवाब मलिकांनी त्यांच्या समर्थनार्थ काहीही वेगळ्या गोष्टी सांगितल्या नाहीत'', असंही शेलार म्हणाले.

''मुंबईत स्वतःच्या खोलीचे मालकी हक्क मिळविण्यासाठी मालक तयार नसतो याची असंख्य उदाहरण आहेत. पण, नवाबी भाडेकरू एक नवीन भाडेकरू झाला ज्यांना खोलीसोबत सर्व इमारतीचा मालकी हक्क दिला. असे नवाबी भाडेकरू मुंबईत सापडणार नाही. मुंबईतील भाडेकरूंना तुम्ही मुर्ख समजता का?'' असा सवालही शेलारांनी उपस्थित केला.

''सरदार शाहवली खान वॉचमन होता. म्हणून त्याला पैसे द्यायला लागले. कुठलाही व्यवहार न करता वॉचमन संपूर्ण इमारतीसह जागेच्या सातबाऱ्यावर नाव चढवू शकतात का? जागा विकत घ्यायला त्यालाही पैसे दिले. नवाब मलिकांच्या नवाबी धंद्यावर मुंबईकर विश्वास ठेवू शकत नाही. झोपडपट्टीची जागा खासगी मालकाची असेल तर सरकार देखील ती जागा हस्तांतरीत करण्यासाठी २५ टक्के रक्कम देते. पण, नवाबी मालक १० टक्के दरावर अख्खी जमीन द्यायला तयार झाला. नवाबी भाडेकरू, नवाबी धंदा, नवाबी दर हे चांडाळचौकटीचे काम करत आहेत'', अशी टीकाही त्यांनी केली.

''होय सरदार शाहवली खानसोब आर्थिक व्यवहार झाला, अशी कबुली स्वतः मंत्री महोदयांनी दिली आहे. राज्याच्या प्रमुखांकडे आमची एकच मागणी आहे, तुमचे मंत्री आता कबुली जबाब देतात. आता मुख्यमंत्र्यांनी एफआयर दाखल करून चौकशी करावी आणि नवाबी रहस्य मुंबईकरांसमोर उघड करावं'', अशी मागणी आशिष शेलारांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case : केजरीवालांच्या निवासस्थानातून पोलिसांनी CCTV DVR केलं जप्त; पुरावे गोळा करुन टीम रवाना

Nashik Lok Sabha Election : नाशिककरांनो, निर्भयपणे मतदान करा! पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे सोशल मीडियावरून आवाहन

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीने केल्या सर्व मर्यादा पार, अश्लील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

SRH vs PBKS Live Score : पंजाबची 150 धावांपर्यत मजल; प्रभसिमरनला बाद करत व्यशकांतने दिला धक्का

SCROLL FOR NEXT