आशिष शेलार Google
महाराष्ट्र बातम्या

तुमच्या गिधाड धमकीला आम्ही घाबरत नाही, सभागृहात शेलार संतापले

आशिष शेलार म्हणाले... ठाकरे सरकारचे हे काय प्रकरण पहिलेच नाही

सकाळ डिजिटल टीम

आशिष शेलार म्हणाले... ठाकरे सरकारचे हे काय प्रकरण पहिलेच नाही

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक मुद्द्यांवरून आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावरील नोटीस संदर्भातील चौकशीनंतर आज सभागृहात त्याचे पडसाद उमटले आहेत. दरम्यान, भाजपाचे आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. तुमच्या गिधाड धमकीला आम्ही घाबरत नाही, अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

यावेळी ते म्हणाले, या राज्यात कायद्याने कामकाज चालणार का नाही हा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत पत्र वाचून दाखवल. पेन ड्राईव्हमध्ये सेन्सिटिव्ह माहिती होती. त्यांनी ही माहिती दिल्लीत दिली आणि राज्यसरकारचा भ्रष्टाचार समोर आणला. ठाकरे सरकारचे हे प्रकरण पहिलेच नाही. नॅशनल हेरॉल्ड केसमध्येही सुब्रमण्यम स्वामींनी कोर्टाला माहिती कशी आली याबाबत सांगितल होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे ते म्हणाले, मला मिळालेले कागद कोर्ट ग्राह्य धरणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. एन. राम. राफेल प्रकरणात जे डॉक्युमेंट आणले, ते डिफेन्सशी सबंधित होते. आम्ही कागद चोरलेले नसून ते सोर्सकडून घेतले आहेत हे न्यायालयानेही सांगितलं आहे. राफेल संदर्भात कागदपत्रे लीक असेल तरी सत्य तपासून पाहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता तुमचा भ्रष्टाचार काढला तर गुन्हेगार करायला निघाला का?, असा सवालही त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. लोकशाही संविधानाचे संरक्षण विरोधी पक्षनेते फडणवीस करत आहेत. याप्रकरणी साक्षीदार फक्त नोटीस आहे आणि प्रश्न आरोपी करणारे विचारत आहात, असेही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT