Ashok Chavan And Sandipan Bhumare Meets Manoj Jarange Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange: जरांगे यांची अशोक चव्हाण अन् भुमरेंनी घेतली भेट; वाचा 3 तास चाललेल्या बैठकीत काय घडले?

Shantata Rally: मोफत शिक्षण, मुलींची फी माफ करणे, व समाजाला त्रास देणे थांबवणे आदी मागण्यांसाठी जरांगे आजपासून मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीची सुरवात हिंगोली जिल्ह्यापासून करत आहे.

आशुतोष मसगौंडे

भाजप खासदार अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी काल रात्री मराठा आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. यावेळी दोन्ही खासदारांनी दोन ते तीन विषयांवर तब्बल 3 तास चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आरक्षण, आमच्या व्याख्या प्रमाणे सगे सोयरे कायद्यांची अंमलबजावणी करणे, हैद्राबाद सह विविध संस्थाचे गॅजेट स्विकारणे, जात प्रमाणपत्र वाटप चालू करणे,गुन्हे वापस घेणे, मुलींना मोफत शिक्षण लागु करणे,मुलींची फी माफ करणे व समाजाला त्रास देणे थांबवणे आदी मागणीसाठी मनोज जरांगे मराठवाड्यात (आजपासून) शनिवार ता.6 रोजी मराठा आरक्षण जनजागृती शांतता राअलीची सुरवात हिंगोली जिल्ह्यापासून करत आहे.

या पार्श्वभूमिवर मनोज जरांगे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि संदीपान भुमरे यांच्यातील ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

कशावर झाली चर्चा?

दरम्यान या बैठकीबाबत बोलताना माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण म्हणाले, आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याशी दोन ते तीन विषयांवर विस्तृत चर्चा केली आहे. आणि ही चर्चा सकारात्मक झाली आहे. जरांगे पाटील यांच्या भेट घेण्यासाठी मला कोणीही पाठवलेले नाही. मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या भेटीसाठी आलो आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणावेळी सरकारने त्यांना वेगवेगळी आश्वासने दिली होती. त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी याला विरोध करत उपोषण केले होते.

आता मनोज जरांगे पाटील यांच्या आणि चव्हाण व भुमरे भेटीवर लक्ष्मण हाके आणि ओबीसी आंदोलकांची काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागणार आहे.

मजोज जरांगे यांचा दौरा खालील प्रमाणे

शनिवार ता.6 रोजी हिंगोली

रविवार ता.7 रोजी परभणी

सोमवार ता.8 रोजी नांदेड

मंगळवार ता.9 रोजी लातुर

बुधवार ता.10 रोजी धाराशिव

गुरुवार ता.11 रोजी बीड

शुक्रवार ता.12 रोजी जालना

शनिवार ता.13 रोजी छत्रपती संभाजीनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT