Ashok Chavan Resignation 
महाराष्ट्र बातम्या

Ashok Chavan Resignation: अशोक चव्हाणांनी एक्सवर पोस्ट करत राजीनाम्याची दिली माहिती; प्रोफाईल फोटो-कव्हर फोटो बदलला

Ashok Chavan Resignation of congress: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी एक्सवर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. ते म्हणालेत की, 'आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे. '

अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत इतर काही आमदार देखील राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अशोक चव्हाण यांचे राजकारण हे सुरुवातीपासून काँग्रेसच्या भोवतीच फिरत आलेलं आहे. पण, ते आता वेगळा निर्णय घेत असल्याचं दिसत आहे.( Ashok Chavan changed profile photo and cover photo on X Giving information about the resignation mla congress party)

अशोक चव्हाण यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेससोबतची आपली नाळ तोडली आहे. एक्सवर त्यांनी आपला उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. तसेच प्रोफाईल-फोटो आणि कव्हर फोटो देखील बदलला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील बडे नेते देखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Farmers: ऐन हंगामात निसर्गाचा घाला! केळी, डाळिंब, मोसंबी बागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी

Bajaj Best Mileage Bikes : मार्केटमध्ये एक दमदार बाईक! 100 कि.मी. मायलेज अन् 91 हजार किंमत, पेट्रोलचं टेन्शन दूर

TasteAtlas च्या जगातील सर्वोत्तम कोळंबी पदार्थांच्या यादीत 'चिंग्री मलाई करी'; जाणून घ्या या प्रसिद्ध बंगाली पदार्थाचा रंजक इतिहास

ENG vs NZ: लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय; WTC Points Table मध्येही उलथापालथ; पाहा कोण कोणत्या स्थानी

Murud Crime: मुरुडमध्ये गोमांससदृश मटण विक्रीवर पोलिसांचा छापा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT