Ashok Chavan_Bavankule 
महाराष्ट्र बातम्या

Ashok Chavan Resignation: अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यावर राज्यसभेची गणितं बदलणार? बावनकुळे यांचं सुतोवाच

माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी बावनकुळेंना प्रश्न विचारले त्यावर त्यांनी उत्तर दिलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळं ते आता भाजप प्रवेश करतील आणि त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात येईल, असंही सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सूचक विधान केलं आहे. (ashok chavan resignation bjp will gives rajya sabha nomination bavankule gives hint)

माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी बावनकुळेंना प्रश्न विचारला की? अशोक चव्हाण भाजपत दाखल झाल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार का? यावर बानवकुळे म्हणाले, आत्तापर्यंत या सेकंदाला माझ्याकडं असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. अध्यक्ष म्हणून माझ्याकडं अशी कुठलीही चर्च झालेली नाही. (Latest Marathi News)

मोदींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे. त्यांच्या या संकल्पाला साथ देण्यासाठी आमची विचारधारा कोणी स्विकारत असेल तर त्यांचं स्वागत आहे. राज्यसभेची निवडणूक काही फार संघर्षाची होणार नाही. कारण सर्वांची क्षमता सर्वांकडं आहे. या राज्यसभा निवडणुकीत फार मोठ्या घडामोडी होतील असं वाटत नाही. (Marathi Tajya Batmya)

कुठल्याही पक्ष प्रवेशाचा पक्षाला फायदा होत असतो. कारण प्रत्येकाकडं क्षमता आहे वलय आहे. त्याचा त्याला फायदा होत असतो. अशोक चव्हाणांसोबत मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकी यांनाही राज्यसभेवर पाठवणार असल्याचं बोललं जात आहे, या प्रश्नावर मला याबाबत काहीही माहिती नाही असंही बानवकुळे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT