Ashok Chavan 
महाराष्ट्र बातम्या

Ashok Chavan Resign: अशोक चव्हाणांनी का दिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा?, स्वतः सांगितलं कारण

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासह आमदारकीचाही राजीनामा दिला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपण राजीनामा का दिला? याचा खुलासाही त्यांनी केला आहे. आपल्या नाराजीचं कारण त्यांनी स्पष्ट केलं आहे. (ashok chavan resignation he told reson behind resign from Congress membership)

चव्हाण म्हणाले, मला कुठलीही पक्षांतर्गत जाहीर वाच्यता करायची नाही. कुणाचाही उणीदुणी काढायची नाही. मी काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काम केलं आहे. आता वेगळ्या पर्यायाचा विचार करायला हवा. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. मी उद्याप इतर कुठल्याही पक्षात सामिल होण्याचा निर्णय घेतलेला नाही. प्रत्येक गोष्टीचं कारण सांगितलं जाऊ शकत नाही. मी काल संध्याकाळपर्यंत पक्षाच्या बैठकीत सहभागी होतो. (Marathi Tajya Batmya)

प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही. माझ्या जन्मापासून आजपर्यंत मी काँग्रेसचं काम केलं आहे. पण मला आत्ता असं वाटलं की मी इतर पर्याय पाहिले पाहिजे. म्हणून मी काँग्रेसच पक्षाचा राजीनामा दिला आहे.

मी कुठल्याही आमदाराशी चर्चा केलेली नाही. माझा राजीनाम्याचा आणि कुठल्याही श्वेतपत्रिकेचा काहीही संबंध नाही. माझी कुणाबद्दलही तक्रार नाही. मी माझी कुठलीही मागणी कुठल्याही पक्षासमोर ठेवलेली नाही किंवा चर्चाही केलेली नाही. मी स्वतः वेळ घेऊन मग निर्णय घेणार आहे. (Latest Marathi News)

चव्हाण का आहेत नाराज?

जागा वाटपाबाबत जेवढ्या गतीनं काम करायलं हवं तेवढ्या वेगानं ते होत नाहीए, हे मला देखील जाणवत आहे. मला बोलण्याचा अधिकार नाही पण जर जागा वाटपाबाबत योग्य वेळी निर्णय झाला असता तर त्याचा फायदा निश्चित महाविकास आघाडीला होऊ शकला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT