ashok chavan sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashok Chavan Resignation : ''भाजपची कार्यप्रणाली मला माहिती नाही, 'तो' निर्णय घेतलेला नाही'', अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी पक्षातून आणि विधिमंडळातून आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पुढे काय? याबाबत भाष्य केलं आहे.

संतोष कानडे

मुंबईः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी पक्षातून आणि विधिमंडळातून आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पुढे काय? याबाबत भाष्य केलं आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यासोबतच काँग्रेस वर्किंग कमिटीचाही राजीनामा दिला. शिवाय विधीमंडळ सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. या निर्णयाबद्दल मला कुणाचीही तक्रार करायची नाही. मला कुणाबद्दलही व्यक्तिगत राग नाही. पुढच्या एक ते दोन दिवसांमध्ये मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं.

'तुम्ही भाजपमध्ये जाणार का? तुम्हाला भाजपकडून राज्यसभेवर संधी मिळणार का?' असा प्रश्न विचारला असता चव्हाण म्हणाले, मला भाजपची कार्यप्रणाली माहिती नाही. मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. पुढच्या दोन दिवसांमध्ये मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे.

'काँग्रेसमधून राजीनामा देण्याचं नेमकं कारण काय?' या प्रश्नाला अशोक चव्हाणांनी उत्तर दिलं की, प्रत्येक गोष्टीला कारण असलच पाहिजे, असं काही नाही. माझ्या जन्मापासून मी काँग्रेसचं काम केलं आहे. आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत, असं वाटलं म्हणून राजीनामा दिला.

पक्षांतर्गत नाराजीवर अशोक चव्हाणांनी भूमिका स्पष्ट केली. कुठल्याही पक्षांतर्गत गोष्टीची मी वाच्यता करणार नाही. मला उणी-दुणी काढायची नाहीत. आपण आता वेगळा विचार केला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. या निर्णयात माझी कोणतीही मजबुरी नाही.

''मी अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही. शिवाय कुण्याही आमदराशी मी बातचित केलेली नाही. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे.'' अशी भूमिका अशोक चव्हाणांनी स्पष्ट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT