ashok chavhan devendra fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : लपून-छपून राजकारण करण्याचा पवारांचा स्वभाव नाही; अशोक चव्हाण फडणवीसांवर बरसले

सकाळ डिजिटल टीम

पुणेः पहाटेच्या शपथविधीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केल्यानंतर राज्याचं राजाकारण तापलं आहे. त्यावरुन अशोक चव्हाण यांनी शरद पवारांच्या राजकारणाबद्दल भाष्य केलेलं असून फडणवीसांवर आसूड ओढले आहेत.

काय म्हणाले फडणवीस?

'आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली, की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवंय, म्हणून आपण सरकार तयार करूया. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, तेव्हा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला.

आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, जी चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. ती काही खाली झालेली चर्चा नाही. शरद पवारांशी चर्चा झाली त्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे, त्यामुळे त्याठिकाणीही आमच्यासोबत विश्वासघातच झाला.

तसेच, 'अजितदादांनी आमच्यासोबत घेतलेली शपथ फसवणुकीच्या नाही तर प्रामाणिक भावनेतून घेतली होती. पण नंतर ते कसे तोंडघाशी पडले हे अजितदादा सांगतील, त्यांनी नाही सांगितलं तर मी सांगीन,' असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.

फडणवीस यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी फडणवीसांना उत्तर दिलं. ते म्हणाले की, देवेंद्रजींना हा साक्षात्कार निवडणुकीच्या तोंडावर कसा होतो हा एक प्रश्न आम्हा सर्वांसमोर आहे. पवार साहेब खूप ज्येष्ठ नेते आहेत ते खूप मुरब्बी नेते आहेत, पवार साहेब असं कधी ही करणार नाहीत. त्यांची आजवरची कारकीर्द राहिलेली आहे जे भूमिका घेतात ते खुलेआम घेतात. लपून छपून राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नसल्याचं अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे.

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात अशोक चव्हाण म्हणाले?

  • कसबा असो किं चिंचवड, महाविकास आघाडीच्याच जागा निवडून येणार आहेत

  • भाजपला अशा प्रकारची रणनीती आखण्याचा दुर्दैवी प्रकार करण्याची वेळ येत आहे

  • ज्याअर्थी केंद्रीय नेतृत्वाला पाचारण करण्यात येत आहे याचा अर्थ की स्थानिक नेतृत्वाला प्रभाव पाडता येत नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dam Water Level : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! धरणांमध्ये 70 टक्के पाणीसाठा, पाणीटंचाईला दिलासा!

Nagpur News : सांगा, कसं करायचं आपत्ती व्यवस्थापन? अनेक गावं धोकादायक पातळीवर, पण सरकार अजूनही झोपेत, ९१ गावांत ‘व्हिलेज किट’च नाही...

Guru Purnima : 'श्री स्वामीचरणी तीन लाख भाविक नतमस्तक'; स्वामीनामाच्या जयघोषात श्री वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी

11th Admission Process: अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी 'या' तारखेला होणार जाहीर; जाणून घ्या जाणून घ्या प्रवेशाचे पुढचे टप्पे

धक्कादायक! प्रेमसंबंधातून जन्मदात्या आईने पोटच्या तीन निष्पाप मुलांची केली हत्या; प्रियकराला जन्मठेप तर, आईला मृत्युदंडाची शिक्षा

SCROLL FOR NEXT