Ashok Gavhane Writes About Shivbhojan Thali 
महाराष्ट्र बातम्या

शिवभोजन थाळीचा फायदा कुणाला? गोर गरिबाला की आणखी कुणाला?

अशोक गव्हाणे

राज्यात शिवसेनेकडून सुरु होणाऱ्या शिवभोजन थाळीचा फायदा कुणाला? गोर गरिबाला की आणि कुणाला? हा प्रश्न थाळीचे संपूर्ण नियोजन बघितल्यास पडल्याशिवाय राहत नाही. शिवसेनेकडून सुरु होणार शिवभोजन थाळी ही २६ जानेवारी पासून चालू होणार आहे, आता तुम्हाला वाटेल की ही थाळी खरंच गरीबांच्या कल्याणासाठी किंवा प्रत्येकाला अन्न मिळावे या हेतून चालू केली जाणार, तर असं अजिबात वाटत नाही.

राज्यातील गरीब व गरजू जनतेला केवळ 10 रुपयात भोजन उपलब्ध करुन देण्यास मान्यता मिळाली असून प्रायोगिक तत्वावर या योजनेचा तीन महिन्यात 6 कोटी 48 लक्ष खर्च अपेक्षित आहे. आता ही योजना चालू करणारासाठी अनुदान मिळणार आहे. शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी 50 रुपये व ग्रामीण भागामध्ये 35 रुपये इतकी राहील.  प्रत्येक ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 10 रुपयाव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून या विभागाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येवून त्यांच्यामार्फत संबंधितांना वितरित करण्यात येईल.

शहरी भागासाठी प्रतिथाळी 40 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रतिथाळी 25 रुपये अनुदान असेल. प्रत्येक भोजनालयात कमाल 500 थाळी सुरु करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. भोजनालयात प्रत्येकी 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅमचा एक मूद भात व 100 ग्रॅमचे एक वाटी वरण समाविष्ट असलेली  शिवभोजनाची थाळी 10 रुपयात देण्यात येईल. ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहतील. आता या थाळीच्या खर्चाचा विचार करायचा झाल्यास पुण्यात अनेक ठिकाणी भाजी चपाती 20 रुपयात मिळणारी केंद्रे आहेत. तसेच, ना नफा ना तोटा या तत्वावर शंकर महाराजांच्या मठावर चालू असलली भोजन व्यवस्थाही आपल्याला माहितच असेल तरीही या केंद्रासाठी प्रत्येक थाळीला ५० रुपये देण्याचा प्रपंच का? जर गरिबांची भोजन व्यवस्था करणे हे पुण्याचे काम असेल ना नफा ना तोटा या तत्वार ते १५ ते २० रुपयांत चांगले जेवण लोकांना देता येऊ शकते.

हे भोजनालय कोण सुरु करू शकतो? या प्रश्नातून बरेच गूढ उकलते... 
भोजनालय सुरु करणाऱ्या व्यक्तीकडे स्वत:ची जागा असणे गरजेचे आहे. म्हणजेच पुण्यासारख्या ठिकाणी भोजनालय चालू करायचे असल्यास तो एखादा नगरसेवक किंवा शाखाप्रमुख वगैरे पक्षाला काहीतरी फायदा असणारा व्यक्तीच करू शकतो हे सष्ट होते. शिवभोजनालय चालू करण्याचा प्रपंच म्हणजे आपल्याच पक्षाच्या नेत्यांना मोठे करण्याचा थोडक्यात मांडलेला प्रपंच वाटतो. आता यातून खरंच किती लोकांना भोजनाचा फायदा होणार आहे हे येणारा काळ सांगेल.

ज्या पद्धतीने मागील काही काळात चालू झालेल्या झुणका भाकर केंद्रांचा बोजवारा उडालेला पाहायला मिळाला, त्याप्रमाणे या योजना राजकीय नेत्यांच्या हातचे बाहुले न होता, या माध्यमातून तरी काही लोकांच्या पोटात अन्नाचा घास जावो हीच अपेक्षा आहे ! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

Fifa World Cup विजेत्या देशाचा क्रिकेटच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाच्या महासत्तेला धक्का; स्पेनचा २१-० हा विक्रम नेमका आहे तरी काय?

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Marathi News Live Updates : वाराणसी विमानतळावर विमानातील प्रवाशाकडे आढळले शस्त्र

घरी नणंदेसोबत कशी वागते करीना कपूर? सैफ अली खानच्या बहिणीने सांगितली आतली गोष्ट; म्हणाली- ती नाटकी...

SCROLL FOR NEXT