Ashok Nete
Ashok Nete  
महाराष्ट्र

Ashok Nete : OBC जनगणना, वनहक्काची अट शिथिल करा! अशोक नेते यांचे राष्ट्रपतींना साकडे

मिलिंद उमरे

गडचिरोली : देशातील ओबीसींची जनगणना करावी, वनहक्काची अट शिथिल करावी अशा मागण्यांचे निवेदन खासदार अशोक नेते यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बुधवार (ता. 5) दिले.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मागण्यांसाठी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तीन निवेदने सादर केली.

त्यावर निश्चितपणे सकारात्मक विचार करण्याची ग्वाही राष्ट्रपतींनी दिली. पहिल्या निवेदनात वनसंवर्धन कायदा 1980 मध्ये सुधारणा करून वनजमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वनपट्टे देण्यासाठी 3 पिढ्यांची अट शिथिल करावी, अशी महत्वपूर्ण मागणी केली. गडचिरोली, गोंदिया तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वनालगत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मागणी महत्वाची आहे.

या अटीमुळे अनेक शेतकऱ्यांना पट्टे मिळण्यापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे तीन पिढ्यांची अट शिथिल केल्यास अनेक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. दुसरी महत्वाची मागणी ओबीसी जनगणनेसंदर्भात करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी समाजाच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी ओबीसी आयोगाची स्थापना केली. परंतू त्याचा हेतू साध्य करण्यासाठी ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी, अशी मागणी खासदार नेते यांनी केली.

तिसऱ्या मागणीत उद्योगांना चालना देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात उद्योजकांना टॅक्स हॅालिडे पॅकेज घोषित करण्याचा आग्रह धरण्यात आला. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र मागास असल्यामुळे या भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, विविध प्रकारच्या खनिज संपत्तीवर आधारित प्रक्रिया उद्योगातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी उद्योजकांना आकर्षित करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना टॅक्समध्ये सूट देणारे पॅकेज जाहीर करावे, अशा महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन खासदार नेते यांनी दिले.

रूषाली उईकेने रेखाटलेल्या चित्राची भेट...

मुलचेरा तालुक्यातील रूषाली उईके हिने रेखाटलेले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे चित्र खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या देशातील पहिल्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना भेट दिले. राष्ट्रपतींनी हे चित्र बघून रूषालीच्या कलेचे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT