Aslam Shaikh meets Devendra Fadnavis Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Operation Lotus 2.0?, काँग्रेसचे अस्लम शेख फडणवीसांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा

Aslam Shaikh meets Devendra Fadnavis

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील काही नेते पक्षसदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा होती. रविवारी रात्री मुंबईतील काँग्रेस नेते माजी मंत्री अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘सागर’ निवासस्थानी भेट घेतली. उद्योगपती मोहित कंबोज यांच्यासमवेत शेख फडणवीसांकडे आले. शेख-फडणवीसांच्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात जोरात चर्चा सुरू होती. (Maharashtra Operation Lotus 2.0)

रविवारी रात्री अस्लम शेख यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर शेख आणि कंबोज हे एकाच कारमधून बाहेर पडले. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मढ, मार्वे, मालवणी या भागातील २८ स्टुडिओंचे पर्यावरणाचे उल्लंघन करून बांधकाम झाले होते. कोरोना काळात झालेले हे बांधकाम अस्लम शेख यांच्या आशीर्वादानेच झाले, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. हा घोटाळा एक हजार कोटींचा असल्याचे सोमय्यांचे म्हणणे होते. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शेख यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले.

काँग्रेसमध्ये नाराजी

महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. ठाकरे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावात काँग्रेसचे काही आमदार गैरहजर होते. विधिमंडळात पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने काँग्रेसचे आमदार विधानसभेत पोहोचू शकले नव्हते. या आमदारांवर कारवाई करण्यासंदर्भात पक्षाने घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात कारवाईच झाली नाही.

मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला गृह, अर्थ तसेच महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी हवी असल्याने विस्तार रखडल्याचे वृत्त आहे. खातेवाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये अद्याप तोडगा निघाला नसल्याने विस्ताराचा दिवस ठरलेला नाही; मात्र लवकरच विस्तार होईल, असा विश्वास शिंदे गटातील एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री दिल्लीला जाऊन आले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचेही सांगितले जाते. मुख्यमंत्रिपद दिल्याने आता सगळी महत्त्वाची खाती आम्हालाच असा आग्रह धरू नका, असे सांगितले जात आहे. याबाबत शिंदे गटातील आमदारांनी मात्र मौन बाळगले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT