महाराष्ट्र बातम्या

विधानसभाअध्यक्ष निवडणूक : ‘राजभवना’च्या चालीकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष्य

नामदेव कुंभार

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनामध्येच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत कोणतीही जोखीम न पत्करण्याची महाविकास आघाडीची व्यूहरचना असून, शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसच्या आमदारांसाठी अधिवेशनाला हजर राहण्याबाबत बुधवारी ‘व्हीप’ काढण्यात आला. अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत सत्ताधाऱ्यांनी चालढकल केल्यास राज्यपाल नेमकी कोणती पावले उचलणार? याकडे आघाडीतील धुरिणांचे लक्ष आहे. महाराष्ट्र विधानसभा ‘नियम- ६’ नुसार राज्यपाल विधिमंडळ सचिवांना सूचना देऊन अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ शकतात. अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधील इच्छुकांत स्पर्धा वाढली असून अनेकांनी त्यासाठी दिल्ली दरबारी धाव घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ५ आणि ६ जुलैला होईल. याच काळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा काँग्रेसचा आग्रह आहे. त्याला मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेही सहमती दर्शविली आहे. याच अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

थोपटे यांचे नाव आघाडीवर

अध्यक्षपदाची निवडणूक ६ जुलैला होण्याची शक्यता असून या पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आमदार संग्राम थोपटे यांच्या नावांची चर्चा आहे. थोपटे यांचे नाव आधीपासूनच आघाडीवर असल्याचे बोलले जाते. हे पद मिळविण्यासाठी चव्हाण, थोपटे यांनी पक्षश्रेष्ठींना साकडे घातले आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात होणार आहे. त्यासाठीची तयारी करण्यात आली असून, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. त्यामुळे या निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार आहे.

- बाळासाहेब थोरात, गटनेते, काँग्रेस विधिमंडळ

या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचे निश्चित आहे. मात्र, राज्यपालांच्या पत्रात निवडणुकीसाठी भाजपचा आग्रह हा उल्लेख चुकीचा आहे. भाजपनेही तसे काही भासवू नये.

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT