Assembly Elections eSakal
महाराष्ट्र बातम्या

Assembly Elections: मविआचा फॉर्म्युला ठरला?, कुणाला मिळणार किती जागा, जागावाटपाबाबत निकष काय?

Assembly Elections 2024: लोकसभेला जागावाटपामध्ये सांगली सारख्या जागांवर झालेल्या चुका टाळण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे.

Sandip Kapde

विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची बातमी सुत्रांनी दिली आहे. ज्या ठिकाणी ताकद आहे त्या ठिकाणी पक्षाला जागा देणार असल्याची माहिती मिळत आहे. आगामी विधानसभेत काँग्रेस १०० ते १०५, ठाकरे गट ९० ते ९५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ८० ते ८५ जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे, साम टिव्हीने ही माहिती दिली आहे.

लोकसभेला जागावाटपामध्ये सांगली सारख्या जागांवर झालेल्या चुका टाळण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे.

मविआचा जागावाटपाबाबत निकष काय?

  • जिथ ताकद तिथे जागा

  • विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग आणि मुंबईतील काही भागांत काँग्रेसची ताकद आहे.

  • कोकणसह मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काही भागात ठाकरे गटाची ताकद आहे.

  • पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील कागी भागांत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकद आहे

  • लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणूक अधिक ताकदीनं लढवण्याचा निर्धार

शरद पवार गटाची १०० जागांची मागणी -


लोकसभेचा स्ट्राईक रेट बघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडे असा प्रस्ताव ठेवल्या जाणार आहे. आठवड्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.


हालचालींना वेग -


पुढली आठवड्यात प्रत्येक पक्ष सर्व्हे करणार आहे. ठाकरे गटाकडून जागांच्या चाचपाणीला सुरुवात करण्यात आली आहे. भास्कर जाधव यांनी विदर्भातील जागांचा आढाव घेतला आहे. काँग्रेसने देखील अंतर्गत सर्व्हे सुरु केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT