Navneet Rana and Ravi Rana esakal
महाराष्ट्र बातम्या

Ravi Rana : विधानसभेतही राणा नकोच! अमरावतीतल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कडाडून विरोध

Navneet Rana : अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करणारे स्थानिक भाजपचे पदाधिकारी रवी राणा यांनादेखील विरोध करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत रवी राणा नको, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

संतोष कानडे

Assembly Election 2024 : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना भाजपच्या अमरावती येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. याशिवाय बच्चू कडू यांचा विरोध होताच. त्यामुळे नवनीत राणा यांना पराभव पत्करावा लागला. आता रवी राणा यांनादेखील विरोध होत आहे.

अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करणारे स्थानिक भाजपचे पदाधिकारी रवी राणा यांनादेखील विरोध करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत रवी राणा नको, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. 'साम टीव्ही'ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

अमरावती जिल्हा भाजपच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघ महायुतीतून भाजपलाच सोडावा व स्थानिक भाजपला उमेदवारी द्यावी, अशी स्थानिक भाजपची मागणी आहे.

''भाजपच्या वरिष्ठांशी जवळीक आणि खालच्या भाजप कार्यकर्त्यांवर वरवंटा फिरवणारे रवी राणा नकोच.'' असा स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोधी सूर आहे. विधानसभा निवडणुकीत रवी राणा यांना उमेदवारी देऊ नका, याबाबत भाजपचे पदाधिकारी श्रेष्ठींना बोलणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Services: मुसळधार पावसाने बससेवा कोलमडली! MSRTC च्या ७,८२० फेऱ्या रद्द; २.३ कोटींचा फटका, BEST चे ९८ मार्ग बदलले!

Chandoli Dam Update : चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार सुरूच, 24 तासांत 128 मिमी तर पाथरपुंजमध्ये 215 मिमी पाऊस; कृष्णा नदीवरील 9 बंधारे पाण्याखाली

Latest Marathi News Update: नाशिकचं संकट टळलं, आता अकोलेला अतिवृष्टीचा धोका; ढगफुटीचा भोवरा सरकला

Gadchiroli: धावत्या एसटी बसचा मागचा पत्रा पडला, निकृष्ट देखभाल व्यवस्थेवर नागरिकांचा तीव्र संताप

Wardha: पाईपला कवटाळून तो १८ तास होता विहिरीत, एनसीसीच्या जवानांनी सेवाग्राममध्ये अर्ध्या तासात केले बचावकार्य यशस्वी

SCROLL FOR NEXT