Rahul Narwekar Mail Hack Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Narwekar Mail Hack: विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक; नार्वेकरांच्या मेलवरून राज्यपालांना ई-मेल

Rahul Narwekar Mail Hack: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ई-मेल हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मेलवरून राज्याच्या राज्यपालांना मेल करण्यात आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Rahul Narwekar Mail Hack: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ई-मेल हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मेलवरून राज्याच्या राज्यपालांना मेल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार नार्वेकरांनी पोलिस ठाण्यात केली आहे.

नार्वेकरांच्या हॅक झालेल्या मेलवरून राज्यपालांना मेल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काल(सोमवारी) नार्वेकरांचा मेल हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान नार्वेकरांच्या मेलवरून जे आमदार सभागृहात नीट वागत नाहीत त्याच्यावर कारवाई करावी, असा मेल राज्यपालांना पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अधिवेशन संपल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

दरम्यान, हि बाब लक्षात येताच, राहुल नार्वेकरांनी मरिन लाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केल्याची माहिती आहे.

फोन हॅक होऊ नये म्हणून काय कराल ?

आपला मोबाईल नंबर बँक खाते, मेल, यूपीआय पेमेंटचे खाते, मोबाईल वॉलेट, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र अशा अनेक महत्त्वाच्या दस्तऐवजांशी संलग्न आहे. यामुळे प्रत्येकासाठी मोबाईल आणि त्यामधील पर्सनल डेटा सुरक्षित राखणे आवश्यक झाले आहे.

हॅकिंग झाल्यावर चूक झाल्याची जाणीव होते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आपल्याबाबतीत असा प्रकार घडू नये आणि मोबाईल हॅक होऊ नये यासाठी चुका टाळा आणि निवडक सोपे उपाय करा. यामुळे मोबाईल सुरक्षित राहील आणि हॅकिंगचा धोका कमी होण्यास मदत होईल.

मोबाईलमधून डेटा ट्रान्सफर करण्यासाठी तसेच मोबाईल चार्ज करण्यासाठी यूएसबी केबल वापरत असल्यास फक्त स्वतःची केबल वापरा. इतर कोणाचीही यूएसबी केबल वापरणे टाळा.

ई-मेल अथवा मेसेजच्या माध्यमातून आलेल्या कोणत्याही लिंकविषयी खात्री नसल्यास त्या लिंकवर क्लिक करणे टाळा. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळा.

स्वतःविषयी महत्त्वाची माहिती ऑनलाईन शेअर करणे टाळा.

WhatsApp सारख्या चॅट अॅप्सवर मीडियाचे ऑटो डाउनलोडिंग बाय डीफॉल्ट बंद करा. डाऊनलोड केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फाइलमधून आपल्या फोनमधील डेटा डीलीट केला जाऊ शकतो अथवा त्या डेटाचा गैरवापर होऊ शकतो. यामुळे खात्री नसल्यास फाइल डाऊनलोड करणे टाळा. अज्ञात व्यक्तीकडून आलेली फाइल डाऊनलोड करणे टाळा. अनावश्यक असलेल्या आणि डुप्लीकेट झालेल्या फाइल डीलीट करा. यामुळे स्टोरेज कपॅसिटीचा व्यवस्थित वापर होईल आणि डेटा सुरक्षित राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT