coronavirus_test_20positive 
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी ! लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला करावा लागणार स्वत: खर्च 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात कोरोनाचा कहर होण्याची शक्‍यता व्यक्‍त झाल्यानंतर सरकारने सर्वच व्यक्‍तींना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचारासाठी पात्र ठरवले. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना कोणतीही लक्षणे नसल्यास तो या योजनेतून उपचारासाठी अपात्र ठरणार आहे. आतापर्यंत सोलापूर, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, औरंगाबाद, सातारा, कोल्हापूर, अकोला, नागपूर येथील दोन हजारांहून अधिक रुग्णांचे अर्ज अपात्र ठरविले आहेत. 


राज्यातील रुग्णसंख्या आगामी पाच दिवसांत एक लाखांचा टप्पा पार करेल इतका वेग वाढला आहे. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. तर दुसरीकडे कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली, मात्र त्याला कोणतीही लक्षणे नाहीत अशा रुग्णांची संख्याही मोठी झाली आहे. सोलापुरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील 65 कैद्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, परंतु त्यातील 60 कैद्यांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेतून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आठ पॅकेज देण्यात आले आहेत. शॉकमध्ये गेलेला रुग्ण, निमोनिया झालेला रुग्ण, किडनीवर सूज, श्‍वसनाचा त्रास, ह्दयरोग असे आठ आजार या योजनांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. 


दोन्ही योजनांमधून आठ पॅकेज 
ज्या
कोरोनाग्रस्त रूग्णाला दहा दिवस व्हेंटिलेटरची गरज लागली अथवा सात दिवस त्याच्यावर विनाव्हेंटिलेटर उपचार केले, असे रुग्णच आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र आहेत. लक्षणे नाहीत, परंतु कोरोनाग्रस्त आहे, असे रुग्ण या योजनेसाठी अपात्र असून सोलापुरातील 100 हून अधिक अर्ज फेटाळून लावले आहेत. 
- डॉ. दिपक वाघमारे, जिल्हा समन्वयक, आयुष्यमान भारत योजना, सोलापूर 


ठळक बाबी... 

  • महात्मा फुले जनआरोग्य तथा आयुष्यान भारत योजनेतून उपचारासाठी आठ पॅकेज 
  • व्हेंटिलेटर लावून दहा दिवस उपचार केलेल्यांना या योजनांमधून मिळतात 50 हजार रुपये 
  • विनाव्हेंटिलेटर सात दिवस उपचार केलेल्या रुग्णांसाठी योजनेतून मिळतात 25 हजार रुपये 
  • कोरोना झाला आहे, परंतु कोणतीही लक्षणे नाहीत, असे रुग्ण दोन्ही योजनांच्या लाभासाठी ठरतात अपात्र 
  • खासगी दवाखान्यांना पीपीई किटच्या वापरापोटी 10 टक्‍के अधिक रक्‍कम योजनातून दिली जाते 
  • दोन्ही योजनांमध्ये राज्यातील एक हजार रुग्णालयांचा समावेश: 20 रुग्णालयांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंर्तगत कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : लडाखमध्ये नवं न्यायालय सुरू; दुर्गम भागात न्याय मिळणं होणार सोपं, CJI सूर्यकांतांचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: ना होर्डिंग, ना डीजे, तरीही जयंती दणक्यात साजरी!; महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाने घालून दिला आदर्श

New Rules From April 1 India : देशात आजपासून अनेक कायदे आणि नियमांत बदल होणार, डिजीटल पेमेंटसाठी कडक सुरक्षा

Latest Marathi News Live Update : हवाई दलासाठी पर्वतीय रडारची खरेदी

आनंदाची बातमी! विद्यार्थिनींना मिळणार दोन हजार विद्यावेतन: चंद्रकांत पाटील यांची घोषणा, ‘कमवा आणि शिका’ उपक्रम

SCROLL FOR NEXT