महाराष्ट्र बातम्या

Governor controversy: ...अखेर राज्यपालांना दिलेला अल्टीमेटम संपला; मविआ लवकरच 'महाराष्ट्र बंद' करणार?

राज्यपालांवर कारवाई करण्यासाठी दिलेला अल्टीमेटम संपला!

सकाळ डिजिटल टीम

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं आणि राज्यामध्ये नव्या वादाला तोंड फुटलं. आधी सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने विरोधकांसह शिंदे गटातील नेत्यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपालांना राज्यातून हटवा, त्यांना दिल्लीला परत पाठवा अशी मागणी विरोधक पक्षांनी केली होती.

राज्यपालांवर कारवाई न झाल्यास पुढील भूमिका 28 नोव्हेंबरला ठरवू असा अल्टीमेटम उदयनराजे भोसले यांनी दिला होता. कोश्यारी यांच्यावर कारवाई न झाल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शांततापूर्ण मार्गाने महाराष्ट्र बंदचा इशारा दिला होता. त्यामुळे आता महाराष्ट्र बंदसाठी महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडून प्रयत्न केले जात होते. सर्व पक्षांनी एकमताने बंदचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आज भूमिका ठरवणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.

राज्यपालांना राज्यातून हटवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदमध्ये ठाकरे गटासह मित्र पक्षांनीही सहभागी व्हावे यासाठी आता खासदार संजय राऊत यांनी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चाही राऊत यांनी केली होती.

राज्यपालांवर कारवाई न झाल्यास पुढील भूमिका 28 नोव्हेंबरला ठरवू असा अल्टीमेटम उदयनराजे भोसले यांनी दिला होता. तर ठाकरे गट आणि महाविकास आघाडी एकत्रित येत महाराष्ट्र बंद बाबत आज भूमिका ठरवणार आहेत. तर उदयनराजे भोसले, संभाजीराजे यासंदर्भात काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष्य लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: फॉर्म, फटका आणि फोकसची परीक्षा! शुभमन गिल-श्रेयस अय्यर आज आमणे सामने; कशी असेल संभावित Playing XI

Nagpur News: कामगाराचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; कामगाराची पार्श्वभूमी व रहिवास

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Laxman Hake:सातारा झेडपी अध्यक्षपदी ओबीसींना डावलले: ओबीसी नेते लक्ष्मण हाके; दोन सप्टेंबरचा अध्यादेश बेकायदा, मराठ्यांनी हक्क हिरावला!

Nagpur News: सिलिंडर साठी ग्राहकांचा उन्हात संघर्ष; वानाडोंगरीत लांबच लांब रांगा ; घरपोच सेवा बंद झाल्याने संताप

SCROLL FOR NEXT