ATS officers in Solapur for investigations to Juber Hungergekar.
Sakal
सोलापूर : सोलापूर शहरातील आयटी इंजिनिअर जुबेर हंगरगेकर याच्या संपर्कातील प्रत्येकाची पुणे व सोलापूरच्या दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) कसून चौकशी सुरू आहे. शुक्रवारी सोलापुरात आलेले ‘एटीएस’चे पथक अजूनही सोलापुरात मुक्कामी आहे. रविवारपर्यंत त्यांनी शहरातील १२ जणांची चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे, साहित्य ‘एटीएस’ला जुबेरकडे सापडले आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे, परंतु त्याच्याशी संबंधित आणखी महत्त्वाची माहिती समोर येईल, अशी खात्री ‘एटीएस’ला आहे. जुबेरला अटक करण्यापूर्वी तो सोलापुरात १८ ते २० ऑक्टोबरपर्यंत सोलापुरात मुक्कामी होता. त्या दिवशी तो कोणाकोणासोबत होता, याचीही चौकशी केली जात आहे. त्या अनुषंगाने तपास करण्यासाठी पथक सोलापुरात दाखल झाले आहे.
सोलापूरचे ‘एटीएस’ पथक व शहर पोलिसांच्या मदतीने जुबेरच्या संपर्कातील व्यक्तींना बोलावून त्यांची चौकशी केली जात आहे. त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री, कॉल डिटेल्स घेतले जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले. जुबेरला ज्या संस्थेने सोलापुरातील कार्यक्रमासाठी बोलावले होते, त्यांचीही चौकशी केली जात आहे. जुबेरची अटक व दिल्लीतील बॉम्बस्फोट, यात काही संबंध आहे का, याची पडताळणी सुरू आहे.
सोलापुरातील तरुणांच्या चौकशीतून काही महत्त्वाची माहिती मिळू शकते, यादृष्टीने तपास करण्यासाठी ‘एटीएस’ पथकाचा सोलापुरातील मुक्काम वाढला आहे. सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत त्यांची चौकशी पूर्ण होऊ शकते, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
‘या’ बाबींची केली जातेय चौकशी!
जुबेरच्या संपर्कातील तरुण त्याच्यासोबत काही दिवसांत कोठे-कोठे गेले होते.
जुबेरच्या सतत संपर्कात का होते, जुबेर त्यांच्याशी काय बोलत होता?
सोलापूर ग्रामीणमधील कुंभारीजवळील शाळेत जुबेर नेमका काय बोलला?
जुबेरच्या संपर्कातील व्यक्ती त्याच्याशिवाय आणखी कोणाच्या संपर्कात होते?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.