solapur city

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापूरकरांनो, शुक्रवारपासून आसरा चौकातून जुळे सोलापूरकडे जाणारा रस्ता बंद! महिला हॉस्पिटल ते जेऊरपर्यंत रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू, वाहनचालकांसाठी ‘हे’ पर्यायी रस्ते, वाचा...

सोलापूर शहरातील महिला हॉस्पिटल ते हॉटेल बालाजी सरोवर या अंतरावरील रस्त्याचे मजबुतीकरण सुरू आहे. सध्या हॉटेल बालाजी सरोवरपासून काम सुरू करण्यात आले आहे. उद्या (शुक्रवारी) आसरा चौकात काम केले जाणार आहे. त्यामुळे आसरा चौकातून जुळे सोलापूरकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील महिला हॉस्पिटल ते हॉटेल बालाजी सरोवर या अंतरावरील रस्त्याचे मजबुतीकरण सुरू आहे. सध्या हॉटेल बालाजी सरोवरपासून काम सुरू करण्यात आले आहे. उद्या (शुक्रवारी) आसरा चौकात काम केले जाणार आहे. त्यामुळे आसरा चौकातून जुळे सोलापूरकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

होटगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते जेऊर या अंतरावरील रस्त्याचे मजबुतीकरण सुरू आहे. सध्या हॉटेल बालाजी सरोवर ते महिला हॉस्पिटलपर्यंत काम सुरू आहे. त्यामुळे आसरा चौकाकडे जुळे सोलापूर व नई जिंदगीकडून येणाऱ्या वाहतुकीमुळे आसरा चौकात वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यासाठी आसरा चौकाकडे येणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी आदेश काढून आसरा रेल्वे ब्रिज ते आसरा चौक हा रस्ता गुरुवारी (ता. २) रात्री बारा वाजल्यापासून काम संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. आदेशाचा भंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

वाहनांसाठी पर्यायी मार्ग असा...

आसरा रेल्वे ब्रिज ते आसरा चौक हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जुळे सोलापूरकडून विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी आसरा रेल्वे ब्रिजजवळील दत्त मंदिर ते बँक ऑफ महाराष्ट्र कॉलनी-मजरेवाडी रेल्वे अंडरब्रिज-चौगुले पार्क युनायटेड ग्रीन-सहारा नगर क्रॉस रोड ते पुढे असा पर्यायी मार्ग उपलब्ध असणार आहे. जुळे सोलापूरकडून होटगी रोडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वैष्णवी प्लाझा-गोविंदश्री मंगल कार्यालय-भारती विद्यापीठ-संत रोहिदास चौकातून पुढे जाता येईल. नई जिंदगीकडून जुळे सोलापूरकडे जाण्यासाठी आसरा चौक-सहारा नगर क्रॉस रोड-चौगुले पार्क युनायटेड ग्रीन-मजरेवाडी रेल्वे अंडरब्रिज ते पुढे असा मार्ग उपलब्ध असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT