Political
Political  esakal
महाराष्ट्र

'25 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला तेव्हा तुम्ही झोपला होता का?'

सकाळ डिजिटल टीम

आम्ही राऊतांसारखा थयथयाट करत नाही, पुरावे असूनही ते गप्प का बसलेत? - भातखळकर

संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आरोप केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सोमय्यांनी काही वेळापूर्वीच दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. याला उत्तर देण्यासाठी सोमय्यांनी फक्त आपले बंगले दाखवून द्यावेत असे वक्तव्य राऊत यांनी केलं आहे. ED च्या धमाक्या देत शेकडो कोटी गोळा करणारे, सोमय्या (Kirit Somaiya) जेलमध्ये जाणार असल्याचं सुचक विधानही राऊत यांनी केलं आहे. या युद्धात आता भाजपाचे आमदार भातखळकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी खासदार राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

ते म्हणतात, संजय राऊत (Sanjay Raut) हे पूर्वी कंपाऊंडरकडून औषध घ्यायचे, आता ते त्यांच्याकडूनही घेत नाहीत. राज्य सरकार आणि अँटी करप्शन ब्युरो तुमचा आहे. आमची कुणाचीही चौकशी करा आम्ही राऊतांसारखा थयथयाट करत नाही. त्यांच्याकडे पुरावे आहेत तर गप्प का बसलेत? असा सवाल आमदार भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, तुमच्या असल्या भंपक आणि गटार गंगेसारख्या जे रोज वाहत आहे त्याला आम्ही घाबरत नाही. कर नाही त्याला डर कशाला. आमची चौकशी करा असं तुम्ही एकदातरी म्हणा. संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र आहे का? यांच्या पक्षाला युती केल्याशिवाय 100 जागाही मिळाल्या नाहीत. राऊतांनी नगरपालिकेची निवडणुक लढवावी, असेही ते म्हणाले आहेत.

राऊत आजवर फक्त राज्य सभेवर गेलेत त्यांनी एकतरी निवडणुक लढवावी. फार आरोप केले तर आम्हीही अब्रु नुकसानीची (Defamation) केस दाखल करू शकतो. किरीट सोमय्या भाजपचे एक वरिष्ठ नेते आहेत. जे काही आरोप संजय राऊत करत आहेत, त्याची माहिती त्यांनी द्यावी. 25 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला तेव्हा तुम्ही झोपला होता का? असा सवालही त्यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT