atul bhatkhalkar, sanjay raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

संजय राऊत झेपतंय तेवढंच बोला; अतुल भातखळकरांचा टोला

जनतेची लूट पचणार नाही. सर्वांचा हिशोब होणार-अतुल भातळकर

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना आणि भाजपमधील वाद चिघळत असतानाच आता 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावरून सेनेने मोदी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. मोदीजी, पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्तानाला कधी जोडत आहात असा प्रश्न शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान ( Narendra Modi) यांना विचारला आहे. यावर भाजपचे खासदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावर राजकीय नेत्यांनी मते मांडण्यास सुरुवात केली आहे. अनेक भाजप शासित राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

अतुल भातखळकरांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणतात, मोदीजी, पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्थानला कधी जोडत आहात? इति संजय राऊत उवाच. मोदीजी करतीलच, तुम्ही तुम्हाला झेपतेय तेवढंच बोला. औरंगाबादचे संभाजीनगर कधी करता आहात ते आधी सांगा असा सवाल भातळकरांनी विचारला आहे.

महाविकास आघाडीवर टीका करताना भातखळकर म्हणाले, वसुलीबाज शिलेदारांच्या काळ्या पैशाचा छडा केंद्रीय यंत्रणांना लागला आहे. त्याच्या झळा आपल्यापर्यंत येणार या कल्पनेने साहेबांचा तोल गेलाय. जनतेची लूट पचणार नाही. सर्वांचा हिशोब होणार असा सूचक इशारा आघाडीला दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : ‘आम्ही मानवतेच्या दृष्टीने न्याय मागतोय’; ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT