atul bhatkhalkar,uddhav thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

'लाईव्ह केलेत की तुम्ही ब्रह्मांडाच्या कानाकोपऱ्यात दिसता'

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून बोलणं-बरळणचा फरक समजून घ्या- अतुल भातखळकर

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान २२ मार्चपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी आज संवाद साधला.यावेळी त्यांनी आपण लवकरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या विधानानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांच्यावर निशाणा साधला आहे. बोलणं आणि बरळण यातला फरक समजून घ्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांचे भाषण जरूर ऐकत जा असा टोमणा ट्विट करत हाणला.

कोरोनाच्या (Corona) लाटेत मुख्यमंत्र्यांना मानेचे दुखणे उध्दभवले यानंतर त्यांना महाराष्ट्रात कोठेही जाता आले नाही. मात्र, आता लवकरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर भाजप नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. अतुल भातळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, येत्या काही दिवसात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेन असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.तसे आताही फेसबुक लाईव्ह केलेत की तुम्ही ब्रह्मांडाच्या कानाकोपऱ्यात दिसता मग फिरायची काय गरज असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला यावरून भातळकर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांना संबोधित करताना आडून आडून पुन्हा धुणी भांडी करावी लागतील अशी भीती व्यक्त केली आहे. बोलणं आणि बरळण यातला फरक समजून घ्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांचे भाषण जरूर ऐका असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT