महाराष्ट्र बातम्या

2 वर्षात ठाकरे सरकारने 20 कोटींचा रतीब घातलाय - आमदार भातखाळकर

भाजप आमदारांनी चौकशी करण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाला पत्र पाठवले आहे.

सकाळ डिजिटल टीम

भाजप आमदारांनी चौकशी करण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाला पत्र पाठवले आहे.

राजकीय वातावरणात नेहमी काही ना काही कारणानं एकमेकांवर टीका केली जाते. दरम्यान आता भाजपाचे आमदार अतुल भातखाळकर यांनी अनिल देशमुख आणि ठाकरे सरकार यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ ट्वीट केलं आहे. २ वर्षात ठाकरे सरकारने सुमारे २० कोटी रुपयांचा रतीब घातला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

यात ते म्हणतात, सध्या तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे नातेवाईक सत्यजित देशमुख यांच्या कंपनीला शून्य कामाचा अनुभव असताना कोस्टल रोडच्या कामात सब कंत्राटदार म्हणून नेमले गेले आहे. 20-21 च्या कालावधीत या कंपनीला कोट्यावधीचे पेमेंट केले गेले. कॅगने चार वर्षांपूर्वी याबाबत ताशेरेही ओढले आहेत. याचमुळे या कंपनीची चौकशी करावी. या कंपनीला काम कुठल्या अधिकाऱ्याने दिले, त्याच्यावर कोणाचा दबाव होता? असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी चौकशी करण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाला पत्र पाठवले आहे. याचसोबत वांद्रे वर्सोवा सी लिंक आणि समृद्धी महामार्गात देखील या कंपनीला गैरमार्गाने काम दिले गेले आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: सहकाराचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी: पृथ्वीराज चव्हाण, कृष्णा कारखान्यात परिवर्तनाची हाक, सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!

Who is Yoane Wissa? रोनाल्डोच्या पोर्तुगालला रडवणाऱ्या योआन विसावर झालेला अ‍ॅसिड हल्ला! मृत्यूच्या दारातून प्रेरणादायी पुनरागमन

Monsoon Active Again : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; मॉन्सून पुन्हा होणार सक्रीय, पुढच्या चार दिवसात पावसाची शक्यता

Jalgaon Monsoon Update : काही भागांत आज दुपारनंतर हलक्या पावसाचा अंदाज; मॉन्सूनसाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार? हवामान अभ्यासकांनी काय सांगितलं?

Belagavi Water Crisis : पाणीटंचाईचं संकट! महाराष्ट्राकडून कर्नाटकला मिळणार का 2 TMC पाणी? मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवकुमार यांच्यात होणार महत्त्वाची चर्चा

SCROLL FOR NEXT