political esakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्राचा खरा अपमान जयंत पाटलांनी केला; भातखळकरांचा पलटवार

सुप्रिया सुळे आणि संजय राऊत राज्याचा अपमान झाला अशी खोटी आरडाओरड करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सुप्रिया सुळे आणि संजय राऊत राज्याचा अपमान झाला अशी खोटी आरडाओरड करत आहेत.

राजकीय वातावरणात सध्या एकमेकांवर आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. लोकसभेत सुरु असलेल्या नेत्यांच्या भाषणांवर विरोधक आणि सत्ताधारी गटांकडून टीका सुरु आहेत. दरम्यान आज भाजपा (BJP MLA) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाण साधला आहे.

ते म्हणाले, काल लोकसभेत (PM Modi) मोदींनी काँग्रेसवर (Congress) केलेली टीका संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांना भलतंच लागली आहे. त्यामुळे दोन्ही नेते राज्याचा अपमान झाला अशी खोटी आरडाओरड करत आहेत. मात्र महाराष्ट्राचा (Maharashtra) खरा अपमान हा काल झाला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. शासकीय दुखवटा असताना शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करत लतादीदींसह त्यांनी देशाचा अपमान केला असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, तुम्ही दोघांनी आधी यासंदर्भात बोलावे आणि मग पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया द्या. जेव्हा सर्व जग सांगत होते जिकडे आहे तिकडे थांबा, अशावेळी मुंबई (Mumbai) आणि राज्यातील मजुरांना, स्थलांतरीतांना भडकावून यूपी, बिहारला पाठवण्याचे काम शिवसेना आणि कॉंग्रसने केले आहे ही वस्तुस्थिती असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Visit : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; मुख्यमंत्र्यांना पत्रानंतर आता पुण्यातील उपोषणस्थळी देणार भेट

Dry Fruits Price: रक्षाबंधन, गणेशोत्सवाआधी खिशाला मोठा फटका! कांदा-साखर कमी होती की काय, आता ड्रायफ्रूट्सही महागले, वाचा नवे दर...

कोल्हापुरात ‘होम मिनिस्टर’चा डंका! २,५०० हून अधिक महिलांनी औक्षण करत रचला विश्वविक्रम

Marathi News Live Updates : राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan 2026 Gift Ideas: बहिणीच्या चेहऱ्यावर हसू आणतील ‘या’ ८ गोष्टी; पाहा एका-पेक्षा-एक भन्नाट गिफ्ट आयडियाज

SCROLL FOR NEXT