Haj Yatra News 
महाराष्ट्र बातम्या

हजसाठी राज्यात ७ हजार भाविकांचे अर्ज, कोरोनामुळे हज यात्रा होणार का अद्यापही संभ्रम

शेखलाल शेख

औरंगाबाद : २०२१ मध्ये हज यात्रेला जाण्यासाठी महाराष्ट्रातून ७ हजार ५५ भाविकांना अर्ज केले आहेत. त्यात मराठवाड्यातील १ हजार ५५३ भाविकांचा समावेश आहे. तथापि, यावर्षी तरी हज यात्रा होईल का, या विषयी संभ्रम असून सौदी प्रशासनाच्या पुढील सूचनांची सर्वांना प्रतिक्षा आहे. मागील वर्षी कोरोनामुळे सौदी प्रशासनाने फक्त त्यांच्यात देशातील नागरीकांना हज यात्रेची परवानगी दिली होती ती सुद्धा अतिशय मोजक्याच.

२०२० मध्ये कोरोना संकट आल्याने अर्ज केलेल्या तसेच पैसे जमा केलेल्या भाविकांना सौदी प्रशासनाच्या निर्णयामुळे हजला जाता आले नाही. बाहेरील देशातील भाविकांना हजची परवानगी न मिळाल्याने केंद्रीय हज समितीने सर्व भाविकांचे पैसे परत केले होते. आता २०२१ या वर्षात फक्त १८ ते ६५ वयोगटातीलच भाविकांना अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे राज्यात अतिशय कमी ७ हजार ५५ अर्ज आले आहे. मात्र, सौदी प्रशासनाने पुढील कोणतच्या सूचना न दिल्याने केंद्रीय हज समितीला ड्रॉसह इतर निर्णय घेणे शक्य झालेले नाही.


नियम अटी, कोरोनामुळे कमी प्रतिसाद
दरवर्षी हज यात्रेसाठी भाविकांचा अर्जाचा पाऊस पडत असतो. मात्र मागील वर्षी यात्रेला परवानगी न मिळाल्याने तसेच या वर्षी कोरोनामुळे नियम अटींसह फक्त १८ ते ६५ वयोगटातील व्यक्तींनी अर्ज करण्याचे सांगितलेले असल्याने अर्ज करणाऱ्या भाविकांची संख्या रोडावली. शिवाय मराठवाड्यातील भाविकांसाठी औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळाऐवजी मुंबई येथून थेट विमानाची सोय या वर्षी करण्यात आलेली आहे.

जिल्हानिहाय आलेले अर्ज
औरंगाबाद- ७३५
जालना- ६७
परभणी- १३४
बीड- २२३
नांदेड- २७२
लातूर - ८५
उस्मानाबाद- ३७

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मशीद शेख यांची महाराष्ट्र केसरीत दमदार कामगिरी; सुवर्णपदकासह बुलेट आणि रोख पारितोषिकावर नाव कोरले

LPG Crisis: ऊर्जा संकटात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! LPG पुरवठ्यात 20% वाढ; वाटप 50% पर्यंत वाढवले, राज्यांना दिलासा

Latest Marathi News Live Update : सहा आमदारांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले

'स्वामी समर्थ'मध्ये सुरू होणार 'महानिर्वाणाचा अध्याय; हे अभिनेते साकारणार प्रौढ स्वामींची भूमिका

Urali Kanchan News : एमआयटी एडीटी–रायन सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी नवोन्मेष आणि तंत्रज्ञान शिक्षणाची नवी दिशा

SCROLL FOR NEXT