High-Court-Mumbai 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात आता उभारले जाणार स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्यातील व्यावसायिक आणि अवजड वाहनांच्या तपासणीतील मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी आणि सुसूत्रता आणण्यासाठी परिवहन विभाग स्वयंचलित केंद्रे उभारणार आहे. नाशिकनंतर कुर्ला एसटी आगारात एक केंद्र उभारले जाणार असून, राज्यातील अन्य १० स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे प्रशासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत.

रिक्षा, टॅक्‍सी, खासगी बस, बेस्ट बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या, व्यावसायिक आणि अवजड वाहनांची आरटीओमध्ये दर दोन वर्षांनी फिटनेस (तंदुरुस्ती) तपासणी केली जाते. त्यामध्ये ब्रेक, प्रदूषण, वाहनांचे सस्पेन्शन, चाके, वेग, हेडलाईट, टेललाईट आदी घटकांचा समावेश असतो. या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप केला जात असल्याने गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही वाहन तपासणीसाठी २५० मीटरचा ब्रेक टेस्ट ट्रॅक आवश्‍यक असल्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यातील ५० आरटीओ विभागांपैकी मोजक्‍या ठिकाणीच असा ट्रॅक तयार करण्यात आला. इतर ठिकाणी जागेअभावी वाहनांची फिटनेस तपासणी रखडली आहे. त्यामुळे परिवहन विभागाकडून प्रत्येक आरटीओमध्ये स्वयंचलित वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार मुख्य सचिवांच्या समितीने सुरुवातीला राज्यातील १० ठिकाणी वाहन फिटनेस तपासणी स्वयंचलित केंद्रे सुरू करण्यास मान्यता दिली. त्यासाठी प्रशासकीय मान्यता अद्याप मिळालेली नाही असे सांगण्यात आले.

१३६ कोटींच्या खर्चाला मंजुरी
नाशिकनंतर फक्त कुर्ला येथील नेहरूनगर एसटी आगारात स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यानंतर मुंबई मध्य, पनवेल, नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, कल्याण, ठाणे या ठिकाणी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे उभारण्यात येतील. त्यासाठी १३६ कोटी रुपयांच्या खर्चाला रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: पॅट कमिन्सच्या जागेवर इशान किशन होणार SRH चा कर्णधार? काय आहेत नवे अपडेट्स?

'सनई चौघडे'चा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला की नाही? नेटकऱ्यांना आठवली 'ही' जुनी मालिका, म्हणतात- जोडी भारीये पण...

Latest Marathi News Live Update : सिलिंडरचा तुटवडा, नागपुरमध्ये 15 ठिकाणी छापेमारी

'Dhurandhar' चित्रपट पाहून अडचणीत सापडला वैभव सूर्यवंशी... म्हणाला, माझी फेव्हरिट मुव्ही... सोशल मीडियावर गदारोळ

Gold Investment: HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च! गुंतवणूकदार दूर जात असताना मोठी एंट्री; सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी?  

SCROLL FOR NEXT