Avinash Bhosale's House Sakal
महाराष्ट्र बातम्या

अविनाश भोसले यांना १० दिवसांची सीबीआय कोठडी

उद्योगपती अविनाश भोसले यांना कोर्टाने १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : उद्योगपती अविनाश भोसले यांना कोर्टाने १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. दरम्यान त्यांना २६ मे रोजी सीबीआयने डीएचएफएल आणि येस बॅंक घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. याप्रकरणी आज मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी पार पडली आहे.

(Avinash Bhosale 10 Day's CBI Custody)

कोर्टाने अविनाश भोसले यांना ८ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयने कोर्टात कोठडीची मागणी केली होती. तर अविनाश भोसले यांनी आपल्याला बेकायदेशीररित्या अटक केल्याचा दावा केला होता. त्यानंतर चौकशीसाठी कोर्टाने त्यांना सीबीआय कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना ८ जूनपर्यंत सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

दरम्यान अविनाश भोसले यांना 26 मे रोजी सीबीआयने अटक केली होती. डीएचएफएल आणि येस बँक घोटाळा प्रकरणात त्यांना अटक केली आहे. त्याअगोदरही त्यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. त्यांना अटक करण्यात आल्यावर आज त्यांच्या या प्रकरणावर विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी पार पडली आहे.

अविनाश भोसले हे पतंगराव कदम यांचे व्याही आणि विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. ते पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. पुण्यातील बाणेर भागात त्यांचे अलिशान घर आहे. तसेच त्यांच्याकडे तीन हेलिकॉप्टर्स आहेत. त्यांच्या घरावर हेलिपॅडही आहेत. राजकारणी लोकांना ते हेलिकॉप्टर्स भाड्याने देतात त्यामुळे ते सारखे चर्चेत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Summer Heat : पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला; बुधवारी ‘यलो अलर्ट’, तापमान पाऱ्याची चाळिशीकडे झेप

पगारवाढीसाठी हजारो कर्मचारी आक्रमक, रस्त्यावर उतरून आंदोलन; गाड्या पेटवल्या, पोलिसांवर दगडफेक

Malvan Ice Mystery : कोकणात निसर्गाचा अजब चमत्कार! निळ्याशार आकाशातून थेट घरावर पडला 5 किलोचा बर्फाचा गोळा; मान्सून लांबणीवर पडण्याचे संकेत?

Gold Rate Today: युद्धाच्या भीतीने सोनं स्वस्त! आजचा भाव किती? सोन्यात आणखी घसरण होणार?

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

SCROLL FOR NEXT