Avinash Bhosale 
महाराष्ट्र बातम्या

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर भोसले यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई हायकोर्टानं हा जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर भोसले यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सीबीआयच्या एका खटल्यात त्यांना हा जामीन देण्यात आला आहे. पण आणखी एका प्रकरणात त्यांना जामीन होणं बाकी आहे. (Avinash Bhosale famous businessman from Pune has been granted bail from mumbai high court in cbi case)

अविनाश भोसले हे जवळपास दोन वर्षापासून कोठडीत आहेत. येस बँक आणि डीएचएफएल घोटाळा प्रकरणात २६ मे रोजी त्यांनी पहिल्यांदा सीबीआयनं अटक केली होती. चुकीच्या पद्धतीनं काही कर्ज दिल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावर आहे. तर दुसरीकडं मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीकडून देखील त्यांचा तपास सुरु आहे.

साधारण वर्षभरापूर्वी अविनाश भोसले यांनी हायकोर्टात जामिनासाठी धाव घेतली होती. पण हायकोर्टानं त्यांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर आज त्यांना सीबीआयच्या प्रकरणात हायकोर्टानं जामीन मंजूर केला. पण अद्याप ईडीच्या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला नसल्यानं त्यांची तुरुंगातून सुटका होतेय की नाही हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VRSची विमानसेवा न वापरण्याचा शिवसेना शिंदे गटाचा निर्णय, शिंदेंच्या मंत्र्यांनीच दिली माहिती

Bribery Case Kolhapur : पोक्सोचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० लाखांची मागणी, तिघांनी लुटायचा प्लॅन आखला पण पोलिसांनी

Latest Marathi News Live Update : अमरावतीमध्ये कार दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू ५ गंभीर जखमी

Sindhudurg News: ऐतिहासिक निर्णय! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५ गावं इको सेन्सिटिव्ह, अंतिम अधिसूचना जारी..

Sakal Kolhapur : 'सकाळ' दिवाळी अंकास सलग दुसऱ्यावर्षी राज्यस्तरीय पुरस्कार; मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे गौरव

SCROLL FOR NEXT