Baba Siddique esakal
महाराष्ट्र बातम्या

Baba Siddique : भाजप हवंय पण थेट प्रवेश नको; विरोधी पक्षातल्या नेत्यांनी शोधली भन्नाट आयडिया

२०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात मेगाभरती झाली होती. काँग्रेससह वेगवेगळ्या पक्षातल्या दिग्गज नेत्यांनी भाजपची वाट धरली होती. यावेळी पुन्हा लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. मात्र आता भाजपऐवजी मित्रपक्षांमध्ये भरती सुरुय.

संतोष कानडे

मुंबईः २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात मेगाभरती झाली होती. काँग्रेससह वेगवेगळ्या पक्षातल्या दिग्गज नेत्यांनी भाजपची वाट धरली होती. यावेळी पुन्हा लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. मात्र आता भाजपऐवजी मित्रपक्षांमध्ये भरती सुरुय.

ज्यांना थेट भाजपमध्ये जाणं शक्य नाही किंवा ज्यांना पोलिटिकली भाजप करेक्ट ठरत नाही; ते नेते आता शिवसेना (शिंदे) किंवा राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांच्या आडोश्याला जाणं पसंत करीत असल्याचं दिसून येतंय.

एकनाथ शिंदे यांनी बंड करुन भाजपसोबत सत्तास्थापन केली. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाले. सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या गटातून शिंदेंच्या गटात, असे प्रवेश व्हायचे. नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांसह अनेक छोट्या-मोठ्या पक्ष संघटनेतून शिवसेनेत प्रवेश झाले.

मिलिंद देवरांचा प्रवेश

मागच्या महिन्यात मुंबईतले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. देवरा यांचा प्रवेश मोदींच्या सांगण्यावरुनच झाल्याच्या बातम्या त्यावेळी आलेल्या होत्या. देवरांनी सुलभ मार्ग म्हणून भाजपपेक्षा शिवसेना बरी; असं म्हणत शिवसेनेशी घरोबा केल्याचं बोललं गेलं.

शिवसेना आणि भाजपची जुनी युती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटातून किंवा त्यांच्या जुन्या इतर मित्रपक्षांमधून भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्यांकडे फार टोकाचा निर्णय म्हणून बघितलं गेलं नाही. परंतु जे नेते काँग्रेसमधून भाजपच्या मित्रपक्षांमध्ये जात आहेत, त्यांच्याबद्दल चर्चा झडत आहेत.

अजित पवार गट सोयीचा

अजित पवार गट भविष्यात अनेकांना सोयीचा ठरण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरचे हक्क अजित पवार गटाला मिळालेले आहेत आणि राष्ट्रवादीची मूळ विचारसरणी काँग्रेसच्या विचारांशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे ही वाट अनेकांसाठी सुकर ठरण्याची शक्यता आहे. त्यातच आता बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडलीय.

बाबा सिद्दीकी हे तीन टर्म आमदार होते आणि चारवेळा त्यांनी राज्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तब्बल ४८ वर्षांची काँग्रेसची साथ त्यांनी सोडलीय. आता ते अजित पवार गटात सहभागी होणार असल्याचं दिसून येतंय. अजित पवार गट आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत सत्तेत आहे. भाजपच्या होकाराशिवाय असे प्रवेश होणं शक्य नाही. किंबहूना ज्यांना भाजपमध्ये थेट जाणं अडचणीचं ठरु शकतं, ते नेते असा पर्याय शोधत आहेत. याचा थेट फायदा भाजपलाच होणार, हे मात्र नक्की.

भविष्यात 'हे' नेते अजित पवार गटात जाणार?

काँग्रेससह बिगरहिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्यांना पुढाऱ्यांना अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोयीचा ठरत आहे. बाबा सिद्दीकी यांच्यानंतर अस्लम शेख, झीशान सिद्दीकी, अमीन पटेल हे काँग्रेसला राम राम करु शकतात. झीशान हे बाबा सिद्दीकींचे पुत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तशा हालचाली सुरु असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येतंय.

बाबा सिद्दीकींचा राजीनामा

मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी तब्बल ४८ वर्षांची काँग्रेसची साथ सोडली आहे. मुंबईतील वांद्रे आणि परिसरातील अल्पसंख्याक समुदायात सिद्दीकींना मानणारा मोठा वर्ग आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सिद्दीकींच्या संभाव्य निर्णयाचा फायदा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

SCROLL FOR NEXT