shivsena.jpg
shivsena.jpg 
महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : 'या' दाेन नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : विधानसभा निवढणूकीचे तिकीट नाकारलेल्या दोन निष्ठावंत शिवसैनिकांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात रणशिंग फुंकले. त्यामुळे जिल्ह्यातील दोघांना मातोश्रीने दणका दिला असून त्यांची हकालपट्टी केली आहे.

नांदेड जिल्हा हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात होता. आताही जिल्ह्यात शिवसेनेचे स्वबळावर मागच्या विधानसभा निवडणूकीत चार आमदार विजयी झाले. त्यात नांदेड दक्षिणमध्ये विद्यमान खासदार हेमंत पाटील, देगलुर सुभाष साबणे, हदगाव नागेश पाटील आष्टीकर आणि सध्या भाजपवासी झालेले नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा समावेश होता.

जिल्ह्यात शिवसेनेची ताकद भाजपपेक्षा अधिक आहे. सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे राजश्री हेमंत पाटील (नांदेड दक्षिण), मुक्तेश्‍वर धोंडगे (लोहा), सुभाष साबणे (देगलूर), बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर), नागेश पाटील आष्टीकर (हदगाव) हे पाच उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत.

परंतु पक्षातील काही बंडखोरांनी शिवसेनेच्या उमेदवाराविरूध्द दंड थोपटले आहे. त्यांच्या बंडखोरीचा फटका शिवसेच्या उमेदवारांना बसत असल्याचे चित्र निर्माण झाले आहेत. हदगाव विधानसभा मतदारा संघात शिवसेनेचे बाबूराव पाटील कोहळीकर यांनी बंडखोरी करून आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची दमछाक केली. त्यांच्याकडे मतदार मोठ्या प्रमाणात वळत असल्याचे दिसून येत आहे.

निष्ठावंताना पक्षाने डावल्याचा राग मतदारांमध्ये आहे. तर इकडे नांदेड दक्षिणच्या उमेदवार तथा खासदार हेमंत पाटील यांच्या सुविद्य पत्नी राजश्री पाटील यांच्यापुढे चांगलेच आव्हान म्हणून प्रकाश कौडगे उभे टाकले आहेत. त्यांच्या मागे लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात जात असल्याचे चित्र दिसत आहे. या दोघांचा अहवाल पक्षप्रमुख उद्वधव ठाकरे यांना देण्यात आल्याने त्यांनी बाबूराव पाटील कोहळीकर व प्रकाश कौडगे यांची सोमवारी हकालपट्टी केली आहे. या दोघांना एेन निवडणुकीत मातोश्रीचा चांगलाच दणका बसला असल्याचे बोलल्या जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT