Bacchu Kadu Esakal
महाराष्ट्र बातम्या

Bacchu Kadu: ''सत्ता गेली चुलीत; आमच्या वाटेला आले तर कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही''

अमरावतीत आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचा मेळावा होत आहे

सकाळ डिजिटल टीम

आज अमरावतीत आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचा मेळावा होत आहे. आमदार रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादासंदर्भात बच्चू कडू आज त्यांची भुमिका मांडत आहेत. कडू नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मेळावा सुरू झाल्यानंतर बोलताना बच्चू कडू म्हणाले की सत्ता चुलीत गेली. प्रहार काही अंडु पांडू नाही. वार करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. आमच्या वाटेला आले तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. 350 गुन्हे घेऊन अंगावर घेऊन फिरतोय असं म्हणत त्यांनी रवी राणा यांच्यावर टीका केली आहे.

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ही पहिली वेळ आहे म्हणून माफ करतो. पुढच्या वेळी माफी मिळणार नाही. पुन्हा आमच्या वाटेला गेल्यास माफी मिळणार नाही. आम्ही विचारांचा झेंडा हाती घेतला आहे. आम्ही कोणाच्या वाट्याला जात नाही आणि आमच्या वाट्याला गेलं तर आम्ही सोडत नाही. मी राजकारणासाठी कोणाचा वापर केला नाही. जली को आग कहते है, बुझी को राख कहते हैं असंही कडू म्हणालेत.

मी उगाच गुवाहाटीला गेलो नाही. निर्णय कडू असले तरी चालेल पण काम गोड करता आलं पाहिजे.जे बंडखोर आहेत तेच पहिल्या पंक्तीत आहे.पहिली वेळ होती म्हणून माफ करतो पण दुसऱ्या वेळी वाटेला गेले तर प्रहरचा वार कसा असतो ते आम्ही सांगू तुम्हाला असंही कडू मेळाव्यात बोलताना म्हणालेत.

बच्चू कडू बोलताना म्हणाले की, राणांबरोबरचा विषय संपला आहे. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून आम्हाला बदनाम केलं जात आहे. आम्ही गुवाहाटीला का गेलो? माझ्याकडे मंत्रिपद होतं. मंत्रिपद सोडून कोण जातं का? पण जिथे तत्त्व येतं तिथे काही निर्णय घ्यावे लागतात, असं बच्चू कडू मेळाव्यावेळी बोलताना म्हणालेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही काँग्रेसला जळतं घर म्हटलं होतं. पण जेव्हा वंचितांना न्याय द्यायची वेळ आली तेव्हा ते काँग्रेससोबत सत्तेत गेले. गोरगरीबांसाठी काही निर्णय घ्यावे लागतात, असं कडू यावेळी म्हणालेत.

आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वादानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर वादावर पडदा टाकला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीनंतर आमदार रवी राणा यांनी दिलगीरी व्यक्त केली. त्यानंतर बच्चू कडू यांनी सोमवारी रात्री कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या आणि आपली भूमिका जाहीर करण्यासाठी आज अमरावती येथे मेळाव्याचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT