Bacchu kadu Sakal
महाराष्ट्र बातम्या

Bacchu Kadu: बच्चू कडूंनी मंत्रालयात मारहाण केल्याप्रकरणात कोर्टाने सरकारी वकिलांना सुनावले खडेबोल

अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्याविरोधातील खटल्याची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली

अंकिता खाणे (Ankita Khane)

मंत्रालयातील समाज कल्याण अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांच्याविरोधातील खटल्याची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीला सरकारी वकील उशिराने हजर झाले. त्यामुळे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चांगले संतापले आणि सरकारी वकिलांना कठोर शब्दांत खडे बोल सुनावले. यावेळी आरोपी बच्चू कडू यांच्यासह सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांना पुढील सुनावणीवेळी हजर राहण्याचे सक्त निर्देश देखील सत्र न्यायालयाने दिले आहेत.

सरकारी पक्षाने बच्चू कडू यांच्याविरोधात आवश्यक तो पुरावा तसेच सीडी सादर न केल्यामुळे न्यायालय संतप्त झाले होते. न्यायालयाने सरकारी पक्षाला याबाबत कडक शब्दांत समज दिल्यानंतर सुनावणी तहकूब केली आहे.

या प्रकरणी आवश्यक तो पुरावा, सीडी अद्याप सादर न केल्यामुळे कोर्टाने चांगलीच खरडपट्टी काढली. मात्र आजची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. यावर पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. मुंबई सत्र न्यायालयात 15 फेब्रुवारीला बच्चू कडू यांनी गुन्हा नाकारला होता.

मंत्रालयातील आयटी विभाग सचिवाला मारहाण करण्यासाठी लॅपटॉप उचलण्याचं प्रकरणात मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी, तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांना पुढील सुनावणी वेळी हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात मंत्रालयात समाज कल्याण अधिकारी यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्रालयामध्ये 26 सप्टेंबर 2018 रोजी उप सचिव प्रदीप चंद्रन यांना शिवीगाळ करून लॅपटॉपने मारहाणी केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्याविरोधात संबंधित अधिकारी यांच्या तक्रारीवरून मरिन ड्रॉईव्ह पोलीस ठाण्यात बच्चू कडू विरोधात भादवी कलम 353, 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

अटल टनेलजवळ भीषण अपघात, बोगद्यातून बाहेर येताच स्कॉर्पिओ थेट नदीत बांधकाम सुरू असलेल्या पिलरवर लटकली, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT