bacchu kadu Sakal media
महाराष्ट्र बातम्या

Bachchu Kadu: खोके घेतल्याचे 1 तारखेपर्यंत पुरावे द्या, अन्यथा... बच्चू कडूंचा राणांना इशारा

आमदार बच्चू कडू यांनी पैसे घेतल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील सत्तांतराच्या वेळी आमदार बच्चू कडू यांनी पैसे घेतल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. आता त्यासंबंधी 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्या अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार राहा असा इशारा बच्चू कडू यांनी राणा यांना दिला आहे. (Bacchu Kadu On Navneet Rana complaint police station)

आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. एकमेकांवर खालच्या पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी राणा यांना इशारा दिला आहे.

याप्रकरणी बच्चू कडू यांनी थेट राजापेठ पोलिस ठाण्यात रवी राणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच रवी राणा यांनी केलेले आरोप सिद्ध झाले तर त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेन, १ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा, अन्यथा आपण कठोर कायदेशीर पावलं उचलणार असल्याचे संकेतही बच्चू कडू यांनी दिले.

रवी राणाने जे काही आरोप केले आहेत ते त्याने सिद्ध करावे. माझ्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी रवी राणाला १ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देतो. एक तारखेला मी अमरावतीतील टाऊन हॉलमध्ये येतो. तिथे त्याने आपले पुरावे सादर करावेत. त्याने केलेले आरोप सिद्ध झाले तर मी त्यांच्या घरी भांडी घासेन. असे आव्हान कडू यांनी राणा यांना दिले आहे.

राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन केले होते ते आंदोलन नसून सेटलमेंट केल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनी थेट राजापेठ पोलिस ठाण्यात रवी राणाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT