Bachchu Kadu|Ravi Rana|Navneet Rana Esakal
महाराष्ट्र बातम्या

Bachchu Kadu: अमरावतीचे मैदान कोण मारणार? अमित शहांच्या सभेपूर्वी बच्चू कडू पोलिसांमध्ये बाचाबाची

Ravi Rana: अमरावती लोकसभा मतदारसंघातून कट्टर विरोध खासदार नवनीत राणा आणि बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाकडून दिनेश बूब आमने-सामने आहेत.

आशुतोष मसगौंडे

अमरावती लोकसभा मतदारसंघातून कट्टर विरोध खासदार नवनीत राणा आणि बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाकडून दिनेश बूब आमने-सामने आहेत. दरम्यान सभेच्या मैदानावरुन आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये आज बाचाबाची झाली आहे.

प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बूब यांच्या प्रचार सभेसाठी आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीमधील सायन्स कोर मैदान 24 तारखेसाठी बुक केले होते. त्यासाठी त्यांनी संबंधित शुल्कही भरले होते.

दरम्यान आज मैदानाची पाहाणी करण्यासाठी जात असताना आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी रोखले. त्यामुळे घटनास्थळी मोठी गोंधळ निर्माण झाला. तसेच आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

यावेळी बच्चू कडू यांनी दावा केला आहे की, 22 आणि 23 एप्रिलसाठी अमरावतीतील सायन्स कोर मैदान बुक केले आहे. त्यामुळे दोन दिवसांसाठी मैदानावर इतर कोणाचाही कार्यक्रम किंवा सभा होऊ नये अशी कडू यांची मागणी आहे.

दरम्यान, आता याच मैदानावर गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे. त्यामुळे भाजपने सभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आपल्याला सभेची परवाणगी मिळालेली असताना मैदानावर भाजपचा हस्तक्षेप कसा? हे पाहाण्यासाठी गेल्यानंतर आमदार बच्चू कडूंना पोलिसांनी अडवले. त्यानंतर कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतर त्यावेळी मंत्री असलेले मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ देत कडू महायुतीमध्ये सहभागी झाले होते. तर दुसरीकडे कडू यांचे कट्टर विरोधक असलेले आमदार रवी राणा आणि अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी भाजपशी जवळीक साधत भाजपचे तिकिट मिळवले आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा भाजपकडून अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर महायुतीमध्ये असूनही आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने बच्चू कडू यांना येथून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कट्टर विरोधकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बाब ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT