Bachchu Kadu sakal
महाराष्ट्र बातम्या

Bachchu Kadu : 'आता एक घाव दोन तुकडे' मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने बच्चू कडू चिडले

संतोष कानडे

मुंबईः मंत्रिपद नाकारुन बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले. परंतु जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा मात्र बच्चू कडू यांना मंत्रिपदासाठी डावलण्यात आलं. आता सहा महिने उलटून गेले तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये, त्यामुळे बच्चू कडू आक्रमक झाल्याचे पहावयास मिळालं.

राज्यामध्ये सध्ये २३ मंत्रिपदं रिक्त आहेत. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल, अशी आशा घेऊन अनेकजण बसलेले आहेत. परंतु विस्ताराची तारीख निश्चित होत नाहीये.

महत्त्वाची बाब म्हणजे राज्य सरकारने दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी मंत्रालयासमोर पेढे वाटले होते. हे मंत्रिपद बच्चू कडू यांनाच मिळेल, अशी परिस्थिती असतांना मंत्रिमडळाचा विस्तार मात्र होत नाहीये.

येत्या २१-२२ तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल, आमदारांना मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे, असं संजय शिरसाट म्हणाले होते. त्यानंतर बच्चू कडू म्हणाले की, शिरसाट यांना कशी माहिती मिळाली, ते माहिती नाही. परंतु सरकारने विस्तार नसेल करायचा तर करु नये. तसं स्पष्टपणे सांगावं. उगीच खिशातून फूल काढायचं, दाखवायचं आणि पुन्हा ठेवून द्यायचं असं करु नये. विस्तार होणार असेल तर लगेच करावा... एक घाव दोन तुकडे करायला पाहिजेत, असं सगळ्या आमदारांचं मत असल्याचं बच्चू कडू म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT