मुंबई : प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपद मिळावं अशी आशा व्यक्त केली आहे. लवकरच नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून यामध्ये आपल्याला ग्रामीण भागाशी संबंधित एखादं मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान ते सध्या शिवसेनेच्या इतर बंडखोर आमदारांसोबत गोव्यात आहेत. (Bacchu Kadu News)
बच्चू कडू यांच्या पक्षाचे दोन आमदार आहेत. ते स्वत: आणि त्यांच्या पक्षाचा अजून एक असे दोन आमदार त्यांच्या पक्षाचे असून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ते गुवाहटीला होते. या बंडात सहभागी होऊन शिंदे फडणवीस यांच्या नव्या सरकारला त्यांनी पाठिंबा दिला आहे. या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या आठवड्या होणार असून नव्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची अपेक्षा केली आहे. आपल्याला ग्रामीण भागात काम करण्याची इच्छा असून त्यासंबंधीत पद आपल्याला मिळावं अशी आशा त्यांनी बाळगली आहे. जलसंपदा विभाग, कृषी किंवा ग्रामविकास मंत्री यापैकी कोणताही विभाग किंवा मंत्रिपद मिळावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे अध्यक्ष असून अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आले आहेत. त्यांनी अनेकवेळा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांच्या आणि अपंगांच्या अडचणी सोडवणारा नेता म्हणून त्यांची विदर्भात ओळख आहे. त्याचबरोबर त्यांचे शेतकऱ्यांच्या आणि अपंगांच्या प्रश्नावरील आंदोलने खूप गाजली आहेत.
दरम्यान विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या आधी प्रहारचा मुख्यमंत्री होणार असल्याचं कडू यांनी सांगितलं होतं. विधानपरिषदेच्या निकालानंतर शिवसेनेचे आमदार रातोरात सुरत गेले आणि तिथून दुसऱ्या दिवशी रात्री गुवाहटीला रवाना झाले आणि त्यानंतरच्या एकूणच राजकीय नाट्यानंतर काल एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि शिंदे मुख्यमंत्री झाले. या नवीन सरकारमध्ये आपल्याला ग्रामीण भागाशी संबंधित मंत्रिपद देण्यात यावे अशी मागणी कडू यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.