Bacchu Kadu Esakal
महाराष्ट्र बातम्या

Bacchu Kadu: 'बच्चू कडू यांचं सदस्यत्व रद्द करावं', ठाकरे गटाच्या आमदाराची मागणी

विशेष न्यायालयाने दोन प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली असल्याने त्यांची आमदारकी तातडीने रद्द करावी अशी मागणी

अंकिता खाणे (Ankita Khane)

विधानसभेचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना नाशिक विशेष न्यायालयाने दोन प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली असल्याने त्यांची आमदारकी तातडीने रद्द करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. तसेच ८ मार्च रोजी बच्चू कडू यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतरही त्यांनी विधानसभेच्या कामकाजात भाग घेतला यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जावी अशी मागणीही अजय चौधरी यांनी केली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने तातडीने रद्द केल्यानंतर राज्यातही त्याच न्यायाने शिक्षा सुनावण्यात आलेल्या सदस्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. बच्चू कडू यांना ८ मार्च रोजी शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर १५ मार्चपर्यंत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे पत्र विधानसभा अध्यक्षांकडून काढणे अपेक्षित असताना २६ एप्रिलपर्यंत कडू यांचे सदस्यत्व रद्द केलेले नसल्याकडे त्यांनी अध्यक्षांचे लक्ष वेधले आहे.

विधानसभेचे सदस्यत्व आपोआप रद्द झालेले माहिती असतानाही बच्चू कडू हे सभागृहाच्या कामकाजात सहभागी झाले म्हणून त्यांच्यावर प्रती दिन ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली जावी अशी मागणीही चौधरी यांनी केली आहे.

उच्च न्यायालयाने शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिलेली आहे, शिक्षेला नाही असेही चौधरी यांनी नमूद केले.

माझ्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली असल्याचे मला माध्यमांकडून कळले. मला एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि शिक्षेला स्थगितीही मिळालेली आहे. त्यामुळे माझ्या विधानसभा सदसत्वावर काहीही परिणाम होणार नाही aसही प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT